ETV Bharat / state

Farmer suicide In Nagpur : स्वत:ची चिता रचून शेतकऱ्याने केली आत्महत्या

नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील किन्ही गावात एक वृद्ध शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Farmer suicide In Nagpur District) आत्माराम मोतीराम ठवकर असे आत्महत्या करणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे.

स्वत:ची चिता रचून शेतकऱ्याने केली आत्महत्या

author img

By

Published : Mar 2, 2022, 7:58 AM IST

Updated : Mar 2, 2022, 9:24 AM IST

नागपूर - नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील किन्ही गावात एक वृद्ध शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Farmer suicide In Nagpur ) आत्माराम मोतीराम ठवकर असे आत्महत्या करणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. या आत्महत्येनंतर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेबाबत कुटुंबीयांनी यावर काही बोलण्यास नकार दिला आहे.

स्वत:ची चिता रचून शेतकऱ्याने केली आत्महत्या
स्वत:ची चिता रचून शेतकऱ्याने केली आत्महत्या

स्वत: उडी घेत आत्महत्या केली

मृत आत्माराम ठवकर यांनी मृत्यूच्या रात्री गावात मंडईनिमित्त आयोजित नाटकाचा रात्रभर आनंद घेतला. पहाटे गावातील मंदिरात पूजा-अर्चा करून ते शेताकडे आले. शेतातील लाकडे गोळा करून सरण रचले. त्यामध्ये स्वत: उडी घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर आत्माराम ठवकर यांच्या मुलासह नातेवाइकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर वेलतूर पोलीसांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घडलेल्या घटनेची पाहाणी केली.

सरणाची केली पूजा

आत्माराम ठवकर यांनी चितेत उडी घेण्यापूर्वी सरणाची मृत्यूपूर्वी विधिवत पूजा केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. आत्माराम ठवकर सधन कुटुंबातील असून ते आध्यात्मिक प्रवृत्तीचे व वारकरी संप्रदायाचे होते. (२००६)मध्ये त्यांच्या श्वसनलिकेवर शस्त्रक्रिया झाली होती. परंतु, हे दुखणे अजूनही सुरूच होते.

हेही वाचा - Nana Patole Comment On BJP : राज्यपालांची हकालपट्टी करा - नाना पटोले

Last Updated : Mar 2, 2022, 9:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.