नागपूर - अंबाझरी तलावात बुडून इंजिनियरचा मृत्यू झाला आहे. मुळचा मुंबईचा राहणारा आनंद द्विवेदी हा नागपूरच्या आयटी कंपनीत काम करत होता. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळच्यावेळी आनंद त्याच्या मित्रांसोबत अंबाझरी तलाव पोहायला गेला त्यावेळी हा प्रकार घडला.
हेही वाचा - पैशाचा हिशोब देत नसल्याने चारित्र्यावर संशय घेत दुसऱ्या पत्नीचा गळा दाबून खून
आनंद आणि त्याचे सहा मित्र हर्षल नावाच्या मित्राने पोहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासोबत आंनदने देखील पाण्यात जायची इच्छा व्यक्त केली. इतर ४ मित्र हे काठावर बसले होते. तलावालगत असलेल्या शेवट्याच्या पायऱ्यांपर्यंत जायचे असे ठरवून आंनद पाण्यात गेला. सोबत असलेल्या हर्षलला पोहता येत असल्याने तो पुढे निघून गेला. मात्र, ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ होऊन देखील आनंद बाहेर न आल्याने मित्र घाबरले. मदतीसाठी काही स्थानिकांनी पाण्यात उड्या घेतल्या मात्र त्यांना अपयश आले. त्यानंतर बचाव पथकाने आनंदचा मृतदेह बाहेर काढला. आनंदचे कुटुंबीय मुंबईच्या माटुंगा भागात राहतात. नोकरी निमीत्त तो मात्र, मित्रांसोबत नागपूरला राहत होता.
हेही वाचा - आमदार चरण वाघमारेंसह भाजप शहराध्यक्षाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल