नागपूर - शहरातील गांधीबाग हा व्यावसायिकांचा परिसर म्हणून प्रसिद्ध आहेत. काल पहाटे गांधीबागेतील होलेसल कापड बाजारा शेजारी असलेले विद्युत रोहित्र खांबांसह उन्मळून पडले. ही घटना पहाटेच्या वेळेत घडल्याने जीवितहानी टळली.
घटना चित्रीत -
रोहित्र कोसळण्याचे ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटना घडण्याअगोदर केवळ एका क्षणा पूर्वी त्या खांबांच्या बाजूने एक मालवाहू गाडी निघाली होती. सुदैवाने ती गाडी कोसळणाऱ्या रोहित्राच्या तडाख्यात सापडली नाही. नाही तर मोठा अपघात झाला असता.
या घटनेनंतर गांधीबाग परिसरातील वीज गेली होती. नागरिकांना या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेची सूचना मिळताच महावितरणचे कर्मचारी आणि तहसील पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.