Girl Child Rescue Nagpur : नागपुरात आठ वर्षीय चिमुकलीला कोंडून दाम्पत्य बंगलोरला; मुलीची सहा दिवसांनंतर सुटका
Girl Child Rescue Nagpur : चिमुकलीला मोलकरीन म्हणून राबवून घेत एका परिवाराने तिला फ्लॅटमध्ये डांबून ठेवलं. यानंतर सहा दिवसांपूर्वीच बंगलोरला निघून गेले. त्या चिमुकलीने फ्लॅटच्या खिडकीतून मदतीसाठी याचना केल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने तिची सुटका केली. वाचा काय आहे हे प्रकरण.. (Child Torture by couple) (Child rescue trapped in house) (Eight year old girl locked in house) (Little girl locked in house) (Couple went to Banglore)
याच फ्लॅटमधून मुलीची सुटका करण्यात आली
Published : Aug 31, 2023, 5:48 PM IST
नागपूर Girl Child Rescue Nagpur : शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि तेवढीचं अमानवी घटना समोर आली आहे. घरकामाला आणलेल्या आठ वर्षीय चिमुकलीला घरातचं कोंडून सहा दिवसांपूर्वी एक कुटुंब बंगलोरला निघून गेल्याची घटना समोर आली आहे. ही चिमुकली खिडकीतून मदतीची याचना करत असल्याने हा प्रकार उजेडात आला. यानंतर काही स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीनं तिची सुटका केली आहे. त्या मुलीला घरकामासाठी विकत घेऊन नागपुरात आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. (Child Torture by couple) (Child rescue trapped in house) (Eight year old girl locked in house) (Little girl locked in house) (House Trapped Child Rescue)
बेसा-पिपळा रोडवरील घटना : हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील बेसा-पिपळा रोडवरील 'अथर्व नगरी' या उच्चभ्रू वस्तीत ही धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या ५ ते ६ दिवसांपासून मुलीला घरात एकटेचं कोंडून कुटुंबिय बाहेरगावी गेले आहे. शेजाऱ्यांनी चिमुकलीची सुटका केली. त्यानंतर तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली. मुलीला हुडकेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
मुलीला व्हायची रोज मारहाण : स्थानिकांनी ८ वर्षीय मुलीची सुटका केल्यानंतर तिची विचारपूस केली तेव्हा तिने तिच्यासोबत झालेल्या सर्व घटनांची माहिती सांगितली आहे. ज्या दाम्पत्याकडे ती राहत होती ते लोक तिला रोज मारहाण करत होते असं देखील पुढे आलं आहे.
पोलिसांनी सुरू केला तपास : ही घटना उजेडात आल्यानंतर हुडकेश्वर पोलीस तपास करत आहेत. आठ वर्षीय मुलीला घरात कोंडून बंगलोरला गेलेल्या दाम्पत्याचा शोध सुरू करण्यात आला असून दाम्पत्य ज्यांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते त्यांना देखील संपर्क करण्यात आला आहे.
पोक्सोसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल : हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी दाम्पत्याच्या विरोधात पोक्सोसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना तपासादरम्यान धक्कादायक माहिती पुढे आल्याने पीडित चिमुकलीची आज वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. नागपूरसह अनेक मोठ्या शहरांमध्ये असलेल्या बंगल्यांवर आणि गल्ली बोळातील छोट्या हॉटेल्समध्ये लहान मुलांची तस्करी करून त्यांना बळजबरीने कामाला लावले जाते. यातील अनेक घटनांमध्ये त्यांचं लैंगिक शोषणही केलं जात असल्याचं वारंवार समोर आलं आहे. पोलीस आणि सामाजिक सुरक्षा विभाग याविरुद्ध कारवाई देखील करते. पण तरी या प्रकारांवर संपूर्ण नियंत्रण मिळविणे पोलिसांना अजूनही शक्य झाल्याचं दिसत नाही.
हेही वाचा: