नागपूर- ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानात बदल घडत आहे. यामुळे पावसाच्या आगमनातही बदल होत आहे. सोबतच, हवामान विभागाचेही अंदाज चुकत असल्याने त्याचा थेट फटका शेतकऱयांना बसत आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून हवामान विभागाचे अंदाज चुकत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे यंदाही पुन्हा मॉन्सून धोका देणार का? अशी संभ्रमावस्था शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
पूर्वी पाऊस सतत तीन-चार दिवस पडायचा. पण गेल्या काही वर्षांत वातावरणात मोठे बदल झाले आहे. तापमान वाढले असून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या आठ-दहा वर्षांतली आकडेवारी पाहिली असता, देशात पावसाचे असमान वितरण वाढले आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी खुप पाऊस, तर काही किलोमीटर अंतरावर पावसाचा एक थेंबही नसल्याचे चित्र आहे. कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ अशी परिस्थिती आहे. त्यातच हवामान विभागाने जेव्हा जेव्हा सरासरी पावसाचा अंदाज वर्तवला, तेव्हा पाऊस कमी प्रमाणात पडला.
खालील वर्षात विदर्भात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडलाय
वर्ष पावसाची टक्केवारी
२०१४ - १४ कमी पाऊस
२०१५ - ११ टक्के कमी पाऊस
२०१७ - २३ टक्के कमी पाऊस
ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामुळे पावसाळा कमी झालाय?
अ.क्र | वर्ष | पावसाची टक्केवारी |
१ | २०१४ | १४ कमी पाऊस |
२ | २०१५ | ११ टक्के कमी पाऊस |
३ | २०१७ | २३ टक्के कमी पाऊस |
ग्लोबल वॉर्मिंगचा पर्यावरणाला मोठा धोका आहे. याचे चटके आता सोसावे लागत आहे. गेल्या काही वर्षांत ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. याचा परिणाम परजन्यमानावरही पडत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पावसाचे एकूण दिवसंही कमी झाल्याने त्याचा फटका राज्यातल्या शेतकऱ्यांना बसत आहे.
देशात पावसाचे प्रमाण कमी झाल्याची बाब हवामान विभागानेही मान्य केली आहे. दरवर्षी चुकलेला हवामानाच्या अंदाजाचा इतिहास आहे. असे असताना, यंदाही हवामान विभागाने महाराष्ट्रात सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे यंदाचा अंदाजही चुकणार का ? असा प्रश्न पुढे आला आहे.