नागपूर - बदलीसाठी खोटी माहिती दिल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या ३२ शिक्षकांच्या चौकशीचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. पती-पत्नी एकत्रीकरण आणि कार्यालयीन अंतर या निकषावर शहराजवळच बदली करण्यासाठी काही शिक्षकांनी पत्नीच्या नोकरीची खोटी कागदपत्रे दिली होती तर, काहींनी पत्नीच्या नोकरीच्या ठिकाणाचे अंतर कमी दाखवल्याचे समोर आल्यानंतर या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
याआधी या ३२ शिक्षकांची प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. यामध्ये अनेकांनी चुकीची माहिती दिल्याचे मान्य केले होते.
याआधी या ३२ शिक्षकांची प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. यामध्ये अनेकांनी चुकीची माहिती दिल्याचे मान्य केले होते. याप्रकरणी दोषी आढळलेल्या शिक्षकांची आता विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाची दिशाभूल करणाऱ्या या शिक्षकांवर कारवाई म्हणून वेतनवाढ कपात करण्यात येणार आहे. तसेच, जिल्ह्यातील शेवटच्या शाळेत बदली करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी चिंतामण वंजारी यांनी दिली.