ETV Bharat / state

नागपुरातील धान शेतीवर दुष्काळाचे सावट; पाऊस नसल्याने पीक करपण्याचा मार्गावर

नागपूरसह विदर्भातील बऱ्याच भागात कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.

धान शेती
author img

By

Published : Jul 16, 2019, 5:27 PM IST

नागपूर - विदर्भातील धानशेतीवर दुष्काळाचे सावट असून पाऊस नसल्याने पीक करपण्याचा मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.

धान शेतीवर आलेल्या संकटाविषयी माहिती देताना शेतकरी

विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. पूर्व विदर्भात साधारण ८ लाख हेक्टर धानाचे क्षेत्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जगण्याचा आधार धान पीक आहे. पण यंदाच्या दुष्काळामुळे या भागातील धान रोवणीवरच मोठे संकट आल्याने जगावे की मरावे, अशा विवंचनेत शेतकरी आहेत.

पावसाने दडी मारल्यामुळे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. जून महिना कोरडा गेला. जुलैमध्ये पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी होता. मात्र, फक्त ३-४ दिवस पाऊस पडल्यामुळे याच पाऊसावर शेतकऱ्यांनी धान लागवड केली. मात्र, आता ते पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे. नागपूरसह विदर्भातील बऱ्याच भागात ३० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची तूट आहे. आज १०-१२ दिवस लोटले तरीही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Intro:नागपूर

धानशेतीवर दुष्काळाचं सावट; पाऊस नसल्याने पीक करपण्याचा मार्गवार

पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातं मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. पूर्व विदर्भात साधारण आठ लाख हेक्टर धानाचं क्षेत्र आहे. त्या मुळे शेतकऱ्यांचा जगण्याचा आधार धनपिक आहे पण यंदाच्या दुष्काळामुळे या भागातील धान रोवणीवरंच मोठं संकट आल्याने जगावं की मरावं अश्या विवंचनेत शेतकरी आहेत.Body:पावसान दडी मारल्याने जमिनीवर भेगा पडल्या आहेत आणि पीक करपण्या च्या मार्गावर आहे. जून महिना कोरडा गेला. जुलै मध्ये पाऊस पडेल या आशे वर शेतकरी होता पण फक्त तीन-चार दिवस पाऊस आलाय याच पाऊसावर शेतकऱ्यांनी धान लागवड केली मात्र ते पीक नष्ट होतय
नागपूरसह विदर्भातील बऱ्याच भागात ३० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची तूट आहे आज १०-१२ दिवस लोटले तरीही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱयांवर आलीय

बाईट - शंकर विघे, शेतकरी, खोपडी

बाईट - संजय सत्यकार, शेतकरी, नेते

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.