नागपूर - राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच शपथ घेतील, असा विश्वास भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी व्यक्त केला. यावेळी जर भाजपने संपूर्ण 288 जागेवर निवडणूक लढवली असती तर निकालाचे चित्र हे 2014 पेक्षा बरेच वेगळे असते असेही व्यास म्हणाले.
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी युतीकडे बहुमताचा आकडा आहे. भाजप आणि शिवसेना मिळून संख्याबळ १६० च्या आसपास होत आहे. त्यामुळे ते सत्तास्थापनेसाठी दावा करु शकतात. मात्र, मुख्यमंत्री भाजपचा करायचा की शिवसेनेचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेने ५०-५० चा फॉर्म्युला वापरला आहे. त्यांनीही मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे. अशातच आता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास व्यास यांनी व्यक्त केला आहे.
भाजपने या निवडणुकीत 150 जागेवर आपले उमेदवार उतरवले होते. त्यापैकी 105 उमेदवारांना निवडून आणण्यात भाजपला यश मिळाले आहे. जर भाजप यावेळी संपूर्ण 288 जागांवर निवडणूक लढली असती तर निकालाचे चित्र हे 2014 पेक्षा बरेच वेगळे असते असा दावा व्यास यांनी केला.