ETV Bharat / state

मोदींच्या पारदर्शी प्रामाणिकतेचा विजय : देवेंद्र फडणवीस, तर वडेट्टीवार म्हणाले 'सेमीफायनल ते जिंकले फायनल आम्ही जिंकू' - राहुल गांधी

Political Reaction On Election Results : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाणा या चार राज्यांपैकी चार राज्यांची मतमोजणी पार पडली. तीन राज्यात भाजपला यश मिळालं तर, तेलंगाणा राज्यात काँग्रेसनं विजय मिळवला. या निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Devendra Fadnavis And Vijay  Wadettiwar
देवेंद्र फडणवीस आणि विजय वडेट्टीवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 9:21 PM IST

प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस आणि विजय वडेट्टीवार

नागपूर Political Reaction On Election Results : चारपैकी तीन राज्यात भाजपाला मिळालेले अभूतपूर्व यश पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पारदर्शी प्रामाणिकतेचा विजय आहे. अशी प्रतिक्रिया व्यक्त करतानाच,आजच्या निकालाने नेमकी पनौती कोण, हे काँग्रेसला आता कळून चुकलं असेल, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तर मागच्या वेळी सेमीफायनल आम्ही जिंकलो पण फायनल हरलो. तसेच आता सेमीफायनल ते जिंकले फायनल आम्ही जिंकू अशी प्रतिक्रिया, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलीय.

नेमकं पनौती कोण काँग्रेस कळाले : जनतेचा नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास आहे. ज्या पारदर्शी प्रामाणिकतेने त्यांनी गरीब कल्याणाचा अजेंडा राबविला, सरकार खऱ्या अर्थाने जनतेसाठी काम करते आहे, हा विश्वास त्यांनी जनतेच्या मनात निर्माण केला. या निकालाने जनतेने इंडिया आघाडी आणि राहुल गांधी यांचा अजेंडा नाकारला हेही स्पष्ट झालं. नेमकी पनौती कोण हेही आता काँग्रेस पक्षाला कळाले असेल आणि त्यामुळे भविष्यात ते असे शब्द आता वापरणार नाहीत.

भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली : या निकालांचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपाची सरासरी मतांची टक्केवारी 10 टक्क्यांहून अधिकने वाढली आहे. छत्तीसगडमध्ये 14 टक्के, मध्यप्रदेशात 8 टक्के तर अगदी तेलंगणात 7 टक्के वाढली. 4 राज्यातील एकूण 639 जागांचे निकाल आज लागले. त्यात 339 जागा भाजपाने जिंकल्या. म्हणजे 50 टक्के पेक्षा अधिक जागा भाजपाने जिंकल्या. आता इंडिया आघाडीची लवकरच ईव्हीएमवर बैठक होईल, असा टोला लगावताना ते म्हणाले की, जोवर या मानसिकतेतून काँग्रेस बाहेर पडत नाही, तोवर त्यांचे काहीच होऊ शकत नाही.

महाराष्ट्रातही मिळणार दणदणीत यश : आगामी लोकसभा निवडणुकीत तेलंगणात भाजपाचेच सर्वाधिक खासदार निवडून येतील. तीच स्थिती कर्नाटकमध्ये सुद्धा अनुभवास येईल. महाराष्ट्रात सुद्धा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश आम्ही मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या यशाबद्दल मी चारही राज्यातील नेते, कार्यकर्ते यांचे अभिनंदन करतो. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांनी या निवडणुकीचे सुयोग्य नियोजन केले त्यांचेही अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले.

राहुल,प्रियांका गांधीनी प्रचंड मेहनत घेतली : आम्ही पराभवाने खचून जाणार नाही, आम्ही लोकशाही संविधान वाचवण्यासाठी लढत आहोत, लढत राहून भाजपाबरोबर त्यांचे मित्र पक्ष लढले. ईडी सीबीआय इन्कम टॅक्स देखील मित्र पक्ष लढले. धार्मिक ध्रुवियकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आम्ही हरलो तरी आम्ही लढत राहू अशी प्रतिक्रिया, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

भारत जोडो यात्रेचा तेलेगणात फायदा : भारत जोडो यात्रेचा फायदा तेलंगणात झाला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी चौदा दिवस तिथे यात्रा केली, या मतदारांनी कौल दिला. तेलंगणा प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांना तुरुंगात पाठवले, मुलीच्या लग्नाला फक्त दहा दिवस जामीन मिळाला. यातून लोकांच्या मनात ही राग होता. या मेहनतीने तेलंगणामध्ये विजय मिळालं

हेही वाचा -

  1. "जनतेला माझा सलाम! हा सुशासन आणि विकासाच्या राजकारणाचा विजय", पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
  2. महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येणार नाही, याचा आम्हाला पूर्ण विश्वास - शरद पवार
  3. "देशात भारत-जोडो, परदेशात जाऊन भारत-तोडो, जनतेनं चांगलाच धडा शिकवला", मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींची खेचली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.