नागपूर - महानगर पालिकेचे महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महापौरांवर झालेल्या गोळीबाराचा विषय सभागृहात लावून धरू, असेही फडणवीस म्हणाले आहेत.
हेही वाचा - नागपूर महापौरांच्या गाडीवर गोळीबार, जोशी थोडक्यात बचावले
नागपूरचे महापौर रात्री कुटुंबातील सदस्यांसह नागपूर शहराबाहेर एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून रात्री घरी परतत असताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात महापौर संदीप जोशी थोडक्यात वाचले आहेत. या घटनेचे संतप्त पडसाद शहरात उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, जोशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची चौकशी करून दोषींना पकडण्याची मागणी विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.