नागपूर Devendra Fadnavis on Toll Plaza : राज्यात टोल नाक्याच्या मुद्यावरून राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) टोल वाढीच्या मुद्यावरून राज्य सरकारला इशारा दिला आहे. त्यावर तब्बल आठ वर्षापूर्वीची माहिती देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव केली आहे.
'या' नाक्यांवर पथकर वसुली बंद : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यातील टोलमाफीसंदर्भात (Devendra Fadnavis On Toll) एक विधान केले होतं. त्याबाबत माध्यमांमधून नेमक्या निर्णया संदर्भात विचारणा होत आहे. त्याबाबतची माहिती अशी की, ३१ मे २०१५ रोजी मध्यरात्री १२ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ३८ पथकर पैकी ११ पथकर स्थानकांवर व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ५३ पैकी १ पथकर अशा एकूण १२ पथकर नाक्यांवर पथकर वसुली बंद करण्यात आली आहे.
'या' वाहनांना देण्यात आली पथकरातून सूट : सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उर्वरित २७ पथकर स्थानके तसंच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या २६ पथकर स्थानकावरील अशा एकूण ५३ पथकर स्थानकांवरील कार, जीप, एसटी महामंडळाच्या बसेस अशा वाहनांना ३१ मे २०१५ रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून पथकरातून सूट देण्यात आली आहे. यासंदर्भात नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सुद्धा २०१७ मध्ये घेण्यात आला होता आणि त्याचा जीआरसुद्धा ३१ ऑगस्ट २०१७ रोजी जारी करण्यात आला.
-
राजसाहेबांनी वाढीव टोलच्या मुद्द्यावर सरकारला सुनावल्यावर, नेहमीप्रमाणे श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांनी, मुद्द्याला बगल देण्यासाठी 'आम्ही राज्यात सत्तेत आल्यापासून सगळ्या टोलवर छोट्या गाडयांना आणि चारचाकी गाडयांना टोलमुक्ती आहे' अशी थाप मारून टाकली.
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
ह्यावर अभिनेत्री तेजस्विनी… https://t.co/iUfjVtKb8l
">राजसाहेबांनी वाढीव टोलच्या मुद्द्यावर सरकारला सुनावल्यावर, नेहमीप्रमाणे श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांनी, मुद्द्याला बगल देण्यासाठी 'आम्ही राज्यात सत्तेत आल्यापासून सगळ्या टोलवर छोट्या गाडयांना आणि चारचाकी गाडयांना टोलमुक्ती आहे' अशी थाप मारून टाकली.
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 9, 2023
ह्यावर अभिनेत्री तेजस्विनी… https://t.co/iUfjVtKb8lराजसाहेबांनी वाढीव टोलच्या मुद्द्यावर सरकारला सुनावल्यावर, नेहमीप्रमाणे श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांनी, मुद्द्याला बगल देण्यासाठी 'आम्ही राज्यात सत्तेत आल्यापासून सगळ्या टोलवर छोट्या गाडयांना आणि चारचाकी गाडयांना टोलमुक्ती आहे' अशी थाप मारून टाकली.
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 9, 2023
ह्यावर अभिनेत्री तेजस्विनी… https://t.co/iUfjVtKb8l
राज ठाकरेंनी दिला इशारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील टोल वाढीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून, सरकारला शेवटचा इशारा देखील दिलाय. राज्यातील टोल प्रश्नासंदर्भात पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, माझा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना प्रश्न आहे, त्यांनी स्वत: टोल शुल्क वाढीविरोधात याचिका दाखल केली होती. मग त्यांनी ती मागे का घेतली? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला बोलवेल, असं ठाकरे पत्रकारांना म्हणाले होते. पण, फडणवीस जे काही बोलत आहेत ते खरं असेल तर माझे कार्यकर्ते प्रत्येक टोल नाक्यावर उभे राहुन तपासणी करतील. टोल नाके बंद नाही झाले तर हे टोल नाके आम्ही जाळून टाकू, असा इशाराही राज ठाकरेंनी दिलाय.
फडणवीसांचा टोल माफीचा व्हिडिओ व्हायरल : तथाकथित व्हिडिओमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी लहान गाड्यांना टोल माफी असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं मनसैनिकांनी लहान चार चाकी वाहनांना टोल न भरता जाण्याचं आवाहन केलं. परंतु, बहुतांश गाड्यांवर फास्ट टॅग लावले असल्यामुळं त्यांचा टोल परस्पर भरला जात असल्याचं आढळून आलं. जर खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे टोल माफीची घोषणा केली होती तर आतापर्यंत टोल का घेतला जात होता? ही लोकांची फसवणूक असून, यापुढे टोल भरणार नाही, अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी दिलीय.
हेही वाचा -