ETV Bharat / state

'काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द बाळासाहेबांना दिला होता का?'

author img

By

Published : Dec 18, 2019, 3:07 PM IST

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा त्रिशुळ सेनेकडे होता. त्यांना अशा कुबड्यांची गरज नव्हती, असा निशाणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

devendra fadnavis criticized shivsena in nagpur
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर - निवडणुकीनंतर आम्ही वाट पाहत होतो. आमच्यासोबत येण्याच्या ऐवजी आमच्या मित्रपक्षांनी दुसऱ्याशी चर्चा केली. बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री बनवू, असा शब्द बाळासाहेब ठाकरेंना दिला होता का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना उपस्थित केला.

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करू, असे सरकारने सांगितले होते. २५ हजार रुपये कोरडवाहू आणि ५० हजार बागायतीला मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. राज्याच्या पुरवणी मागण्यांमध्ये साडेसातशे कोटींची तरतूद दिसली. २३ हजार कोटी रुपये पुरवणी अर्थसंकल्पात दाखवायला पाहिजे होते. सरकारची सुरुवात विश्वासघाताने होत असेल, तर विश्वास ठेवायचा कसा? केंद्र सरकारच्या जोरावर घोषणा केली होती का? तुम्ही स्वतःच्या जोरावर घोषणा केली होती. आता तुम्हीच शेतकऱ्यांना मदत करा.

मनमोहन सिंगच्या काळात फक्त ३ हजार कोटी मिळाले. मोदीच्या काळात ११ हजार कोटी मिळाले. पहिलेचे आश्वासन तुम्ही पाळणार नसाल, तर इतर आश्वासनांचे काय होईल? संविधानाच्या अतंर्गत मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांची संख्या १२ असणे अनिवार्य आहे. मात्र, सहाच मंत्री आहेत. शेतकऱ्यांना लवकर मदत मिळेल म्हणून आम्ही अपवाद मान्य केला. मात्र, शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळाली नाही. या सरकारने शेतकऱ्याची निराशा केली आहे.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा त्रिशुळ सेनेकडे होता. त्यांना अशा कुबड्यांची गरज नव्हती, असे म्हणत त्यांनी काँग्रेस, राष्ट्वादीवर त्रिपक्षीय सरकारवर निशाणा साधला.

Intro:Body:

news 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.