ETV Bharat / state

पदवीधर रणधुमाळी : फडणवीसांच्या बोटाला शाई लावायला विसरले अधिकारी - devendra fadanvis voted graduate election nagpur

मतदान केल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रसार माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांना बोट दाखवण्याची विनंती करण्यात आली. यावेळी आपण बोटाला शाई न लावताच बाहेर आलो आहे, असे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी बोटाला शाई लावून घेतली.

devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Dec 1, 2020, 2:29 PM IST

नागपूर - देशाचे एक सजग नागरिक म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईवरून थेट नागपूर गाठले. यानंतर त्यांनी तेथे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान करत आपले कर्तव्य बजावले. मात्र, मतदान केल्यानंतर त्या कक्षेतून बाहेर आल्यानंतर मतदान केल्यानंतर बोटाला लावायची शाईच लावायला विसरले, हे लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा मतदान कक्षात जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली.

नागपूर मतदान केंद्रावरची दृश्ये.

कदाचित देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्षात बघून निवडणूक अधिकाऱ्यांना विसर पडला असावा, किंवा बाहेर येण्याच्या घाईत फडणवीसच बोटाला शाई लावून घ्यायला विसरले असतील, असेच म्हणावे लागेल.

हेही वाचा - बॉलिवूडला कोणी मुंबईबाहेर नेऊ शकत नाही - चंद्रकांत पाटील

मतदान केल्यानंतर ते प्रसार माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांना बोट दाखवण्याची विनंती करण्यात आली. यावेळी आपण बोटाला शाई न लावताच बाहेर आलो आहे, असे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी बोटाला शाई लावून घेतली.

बोटाला शाई लागल्यानंतरच मतदानाची प्रक्रिया पूर्ण -

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून निवडणुकीकडे बघितले जाते. प्रत्येक भारतीयांनी निवडणुकीत मतदान करून या प्रक्रियेचा भाग होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मतदाराने मतदानाच्या ठिकाणी जाऊन आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे सुनिश्चित करणे गरजेचे आहे. मतदाराने आपल्या मताचा प्रयोग केल्यानंतर मतदाराने मतदान केले आहे याकरिता त्याच्या बोटाला शाई लावली जाते. त्यानंतरच मतदाराने केलेली मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समजले जाते. मात्र, आज फडणवीस यांनी मतदान केल्यानंतर बोटाला शाई लावायला विसरून गेल्याने या घटनेची मतदान केंद्रावर चर्चा सुरू होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.