नागपूर : राज्याच्या सीमावर्ती भागातील नागरिकांच्या पाठीशी महाराष्ट्राचा सरकार भक्कमपणे (express his views about Citizens of border areas of state) उभे आहे. त्यांच्यावर कुठल्याही अन्याय होऊ नये, अशी आमची भूमिका असणार आहे आणि या संदर्भात लोकतांत्रिक पद्धतीने मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याला परवानगी नाकारण्यात आली. या संदर्भातील चर्चा आम्ही कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी करु. कुठल्याही परिस्थितीमध्ये सीमावर्ती भागासाठी राज्याची जी भूमिका आहे, त्यापेक्षा तसूभरही मागे येणार नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर सांगितलं की, जे काही ट्विट्स असंतोष तयार करणारे होते माझे नाहीत. ते ज्यांचे असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार. आणि काय कारवाई झाली त्याची माहिती घेऊ, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.
नक्षली चळवळीत गडचिरोलीतील तरुण नाहीत - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले की, विदर्भातील नक्षलवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील तरुण यापुढे बेकायदेशीर चळवळीत सामील होत नाहीत आणि नक्षलवादी चळवळीत नवीन भरती ओडिशा आणि छत्तीसगडमधून आणली गेली आहे.
मोर्चा नॅनो होता यावर शिक्कामोर्तब : विरोधी पक्ष आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांचा कालचा मोर्चा नॅनो ठरल्यामुळे त्यांजी आत्मचिंतन केलं पाहिजे. महाविकास आघाडीचा मोर्चा नॅनो होता, यावर संजय राऊत यांनी जो व्हिडीओ ट्विट केला आहे, त्यामुळे शिक्कामोर्तबच झालं असल्याने फडणवीस म्हणाले आहेत.
द्वेष भावनेतून लोकायुक्त विधेयक आणले नाही : सीबीआय आणि ईडीचा दुरुपयोग हा मागच्या सरकारच्या काळात झाला आहे. आम्ही जे लोकायुक्त विधेयक आणतो आहे, त्यात मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे. केंद्रामध्ये ज्या तरतुदी पंतप्रधानांकरता केलेल्या आहे, तशाच तरतुदी अण्णा हजारे यांच्या कमिटीने महाराष्ट्रात केल्या आहेत. तोच ड्राफ्ट मान्य केला आहे. कोणालाही नजरेसमोर ठेऊन लोकायुक्त विधेयक आणले नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.