नागपूर : दीक्षाभूमी ते लेह लद्दाख धम्म पदयात्रेला नागपुरातून सुरूवात झाली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत बौद्धमय करण्याचा संकल्प केला होता. त्या संकल्पासह बुद्धांचे धम्मचक्र गतिमान करण्याच्या उद्देशाने ही पदयात्रा काढण्यात आली आहे. थायलंड येथील मुख्य भन्ते पहरा थेपारीया तीसुथीसह १० भंतेंच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुद्धांना अभिवादन करुन या धम्म पदयात्रेला प्रारंभ झाला. ही पदयात्रा 15 जुलैला लेह लद्दाखला पोहचणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
जातीयवाद संपवण्यासाठी बुद्धांचा मार्ग स्वीकारावा लागेल : बाबासाहेब आंबेडकर सभागृहात १०० अनुयायांना थायलंड पद्धतीने श्रामणेर दीक्षा देण्यात आली. थायलंड येथील मुख्य भन्ते पहरा थेपारीया तीसुथी यांनी सर्वांना श्रामणेर दीक्षा, पंचशील आणि २२ प्रतिज्ञा दिल्या. यावेळी बोलताना भन्ते पहरा थेपारीया तीसुथी यांनी जगात फार अशांतता निर्माण झाली आहे. आपापसातील वैर वाढले आहे. द्वेष, मत्सरासह जातीयवाद वाढला आहे. यातून मुक्ती जर हवी असेल तर बुद्धाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे.
भारतात तथागतांचे धम्मचक्र दिसत नाही : तथागत भगवान बुद्ध भारतात जन्माला आले, मात्र त्यांचा धम्म विदेशातच मोठा प्रमाणात भरभराटीस आला. भारतात बुद्ध धम्म आणि तथागतांचे धम्मचक्र कुठेच दिसत नाही. तथागत भगवान गौतम बुद्धांचा समता, बंधुता आणि शांतीचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली आहे. त्यासह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भारत बौद्धमय करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी, बुद्धांचे धम्मचक्र गतिमान करण्याच्या उद्देशाने ही धम्म पदयात्रा आयोजित करण्यात आल्याची माहितीीह यावेळी देण्यात आली.
धम्म पदयात्रा 15 जुलैला पोहोचणार लेह लद्दाखला : गगन मलिक फाऊंडेशन आणि आश्रय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी ते लेह लद्दाखपर्यंत धम्म पदयात्रा दीक्षाभूमी येथून सुरू झाली. 6 ते 8 मे असे दोन दिवस सिहोरा कन्हान येथे श्रामनेर प्रशिक्षण झाल्यानंतर जवळपास 100 श्रामनेरांना राजगीर येथे नेण्यात येईल. तेथून वेणुवन आणि वेणुवन ते बुद्धगया, बुद्धगया ते धर्मशाला येथून धम्म पदयात्रेला सुरुवात होईल. या धम्म पदयात्रेत भारतातील 100 तर थायलंडचे 100 भंते सहभागी होतील. ही धम्म पदयात्रा 15 जुलै रोजी लेह लद्दाख येथे पोहोचणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
- हेही वाचा -
What Is Honeytrap : हनीट्रॅपमध्ये कसे अडकवले जाते? कशी होते फसवणूक? पाहा व्हिडिओ... Sharad Pawar : शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम; पक्षात सुधाराची आवश्यकता IRCTC चे गोल्डन ट्रँगल टूर पॅकेज, रामोजी फिल्म सिटीसह 'या' ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल |