नागपूर - नागपूर जिल्ह्यात कोरोना परिस्थितीचे चित्र बदलत असून रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. आज पाच हजाराच्या खाली कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. मागील आठवड्यात सात हजाराची सरासरी असताना या आठवड्यात मागील चार दिवसात घसरण झाली आहे. 4987 बाधित मिळून आले असून 6 हजार 601 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये 1614 जण हे बाधितांच्या तुलनेत अधिक रुग्ण बरे झाले आहेत. यात सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे.
आज नागपूर जिल्ह्यात 20 हजार 178 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये एकूण 3161 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरी भागातील तर ग्रामीण भागातील 1814 बाधित रुग्ण मिळून आले आहे. तसेच आज 76 रुग्णांचा नागपूर जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरी भागात 48, ग्रामीण भागात 16 तर जिल्हाबाहेरील 12 जण हे कोरोनामुळे दगावले आहेत. आज 6 हजार 601 जण कोरोनामुक्त होत सक्रिय रुग्णसंख्येत चौथ्या दिवसात घट होऊन 76 हजार 726 वरून 72,437 वर पोहचली आहे. यामुळे मागील चार दिवसात 4289 अॅक्टिव्ह रुग्ण बरे झाले आहेत.
पूर्व विदर्भात 11 हजार 162 कोरोनामुक्त..
शुक्रवारी पूर्व विदर्भात 7 हजार 657 हे कोरोना बाधित मिळून आले असून 11हजार 162 जण कोरोना मुक्त झाले आहे. यात बाधितांच्या तुलनेत 3505 रुग्ण हे अधिकचे बरे झाले आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील मिळून मृत्यूचा आकड्यात आज घट झाली असून मागील 24 तासत 127 जण दगावले आहे. यात पॉझिटिव्ह रुग्णाच्या टक्केवारीत घट झाली आहे.
दिलासादायक.. नागपुरात नव्या कोरोनाबाधितांची संख्या पाच हजारांच्या खाली, सलग चौथ्या दिवशी घट - नागपूर कोरोना
नागपूर जिल्ह्यात कोरोना परिस्थितीचे चित्र बदलत असून रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. आज पाच हजाराच्या खाली कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. मागील आठवड्यात सात हजाराची सरासरी असताना या आठवड्यात मागील चार दिवसात घसरण झाली आहे.