ETV Bharat / state

राज्यातील आणि परराज्यातील परवानगीबाबत 8 मे पासून निर्णय : नागपूर जिल्हाधिकारी

author img

By

Published : May 5, 2020, 11:20 AM IST

नागरिकांनी केलेला परवानगीचा अर्ज ज्या जिल्ह्यासाठी आहे, त्या संबंधित जिल्हाधिकारी यांची मान्यता घेतल्यानंतर परवानगी देण्यात येईल. परवानगी मिळण्याबाबतच्या अर्जामध्ये 4 हजार 490 अर्ज हे शासनाने वाहन व्यवस्था करावी, याबाबतचे आहेत.

Nagpur District Collector Ravindra Thackeray
नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

नागपूर - लॉकडाऊनमुळे इतर राज्यातील हजारो नागरिक, विद्यार्थी आणि कामगार नागपूर जिल्ह्यात अडकून पडले आहेत. त्या सर्वांनी घरी जाण्यासाठी ई-पास करिता अर्ज केले आहेत. त्या अर्जदारांना 8 मे पासून पुढील निर्णय कळवण्यात येईल. तशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात येणार आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा... कोरोना : दिवसभरात ७७१ नवे रुग्ण, राज्याचा आकडा १४ हजार ५४१ वर

नागरिकांनी केलेला परवानगीचा अर्ज ज्या जिल्ह्यासाठी आहे, त्या संबंधित जिल्हाधिकारी यांची मान्यता घेतल्यानंतर परवानगी देण्यात येईल. परवानगी मिळण्याबाबतच्या अर्जामध्ये 4 हजार 490 अर्ज हे शासनाच्या वाहन व्यवस्था करावी, याबाबतचे आहेत. रेल्वेची व्यवस्था झाल्यावर मोबाइलवर अर्जदारास कळवण्यात येणार आहे. स्वतःच्या वाहनाने जाण्याबाबत 2 हजार 472 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 83 अर्ज नागपूर शहरातील कॅटेनमेंट झोनमधील असल्यामुळे रद्द करण्यात आले आहेत. 226 अर्जदारांनी नागपूर येथील त्याचा पत्ता नमूद केला नाही आणि अपूर्ण आहे. उर्वरित 2 हजार 153 अर्जामध्ये ते ज्या जिल्ह्यात जाणार आहेत, त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांचे सोबत पत्रव्यवहार करण्यात आला.

जिल्ह्यातील 2 हजार 153 अर्जदारांना दिनांक 6 मे रोजी महानगर पालिका क्षेत्रात जिल्हाधिकारी कार्यालय येथील सेतू अथवा तहशील कार्यालयामधून परवानगी पत्राचे वितरण करण्यात येणार आहे. या शिवाय ग्रामीण भागातील 862 अर्जदाराच्या परवाणगीचे वितरण संबंधित तहसीलदार कार्यालयातून केले जाणार आहे. या व्यतिरिक्त परवानगीसाठी महाराष्ट्र पोलीस ई-पास प्रणावलीवर ज्या अर्जदारांनी नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या बाहेरील क्षेत्रातून अर्ज केले आहे. त्याबाबत ऑनलाईन दिनांक 8 मे पासून कळवण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.