ETV Bharat / state

Devendra Fadnavis Meet Ashish Deshmukh : देवेंद्र फडणवीसांनी घेतली आशिष देशमुखांची भेट, भाजप प्रवेशाची चर्चा - राहुल गांधी यांच्यावर टीका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आशिष देशमुख यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चांगलाचा धुरळा उडाला आहे. आशिष देशमुख यांना राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यामुळे काँग्रेसने निलंबित केले आहे.

Devendra Fadnavis Meet Ashish Deshmukh
देवेंद्र फडणवीसांनी घेतली आशिष देशमुखांची भेट
author img

By

Published : May 20, 2023, 3:34 PM IST

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष देशमुख यांची त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. तीनही नेत्यांमध्ये सुमारे ५० मिनिटे चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस आणि आशिष देशमुख हे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, आज देवेंद्र फडणवीस अचानकपणे आशिष देशमुखांच्या घरी नाश्त्यासाठी गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. आशिष देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

आशिष देशमुखांनी दिला होता आमदारकीचा राजीनामा : डॉ आशिष देशमुख हे 2014 साली पहिल्यांदा भाजपचे आमदार म्हणूनच निवडून आले होते. मात्र, तीन वर्षातच त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर 2019 साली आशिष देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातून निवडणूक लढवली होती. मात्र गेल्या वर्षभरात आशिष देशमुख यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठीसह प्रदेशाध्यक्षांवर टीका केल्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

२०२४ च्या तयारीला वेग : कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नागपुरात नवीन राजकीय समीकरण जुळून येत आहे. २०१४ साली भाजपच्या तिकिटाकरून आमदार झालेले डॉ. आशिष देशमुख यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते काँग्रेसवासी झाले. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांसोबत त्यांचे सूर जुळत नव्हते. आशिष देशमुखांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत गेल्या महिन्यात काँग्रेसने त्यांना निलंबित केले आहे.

केदारांच्या विरोधात सावनेरमध्ये हवा चेहरा : सावनेर हा विधानसभा मतदारसंघ कधीकाळी काँग्रेस नेते रणजीत देशमुख यांचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र, सुनील केदार हे सावनेर येथून जिंकून आले. त्यानंतर गेली दोन दशके सुनील केदार यांनी मतदारसंघात वर्चस्व कायम ठेवले आहे. सुनील केदार यांना मात देण्यासाठी भाजपकडून अनेकदा मोर्चेबांधणी करण्यात आली, परंतु केदारांचा किल्ला मात्र उद्ध्वस्त करण्यात भाजप अपयशी ठरली आहे. सावनेरमध्ये भाजपला केदारांविरुद्ध दमदार चेहरा हवा आहे. गेल्या काही दिवसापासून डॉ. आशिष देशमुख हे देखील सावनेर येथून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आशिष देशमुख यांच्या घरी सदिच्छा भेट दिली आहे. त्यामुळे आशिष देशमुख 2024 ची विधानसभा निवडणूक सावनेर येथून भाजपच्या उमेदवारीवर लढतील अशी चर्चा देखील सुरू झाली आहे.

गेल्या महिन्यात आशिष देशमुख बावनकुळेच्या घरी : गेल्या महिन्यात २४ एप्रिल रोजी काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपुरातील घरी भेट घेतली होती. आशिष देशमुख भाजपमध्ये घरपावसीसाठी प्रयत्न करत आहेत, अशी देखील चर्चा सुरू झाली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आशिष देशमुख यांनी त्यांच्यावर जाहीरपणे टीका केली होती. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित केलेले आहे. मला जरी पक्षाने आज निलंबित केले असले तरी पक्ष मला बरखास्त करू शकत नाही ,असे ते म्हणाले होते.

हेही वाचा -

  1. KCR On BRS Model In Country : विकासाचे बीआरएस मॉडेल भारतभर नेणार; बीआरएसने सुरू केली 288 मतदार संघात लढण्याची तयारी - केसीआर
  2. Raj Thackeray On Narendra Modi : हिंदू धर्म इतर धर्मीयांमुळे भ्रष्ट होणारा नाही, नोट बंदीची धरसोडवृत्ती चांगली नाही; राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
  3. Maharashtra Ministry Expansion : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्ली दरबारी, मंत्रिमंडळाच्या विस्ताराला हिरवा कंदील ?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.