नागपूर : १ कोटी १५ लाख रुपयांची रोकड लूट प्रकरणी नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयित आरोपींना पुण्यातून ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपींना पुणे येथून नागपूरला आणण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे. बुधवारी रात्री गुन्हा घडल्यानंतर दोनही आरोपी हे पुण्याला पळून गेल्याची माहिती पोलिसांना समजली होती. माहितीच्या आधारे गुन्हे शाखा पोलिसांचे एक पथक तात्काळ पुण्याला रवाना झाले होते. पोलिसांनी शिताफीने आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आज सकाळी नागपूरला आणले आहे.
दोन आरोपींना अटक : दीपक जाट आणि नेमावर अशी आरोपींचे नावे आहेत. ते व्यापारी विरम पटेल यांच्याकडे काम करायचे. आरोपींकडून एक कोटी १५ लाखांची रोकड अद्यापही जप्त झालेली नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त गोरख भांबरे यांनी दिली आहे. या प्रकरणात सध्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे देखील त्यांनी सांगितले आहे.
आरोपींना सकाळी नागपूरला आणले : मंगळवारी रात्री नेहरू पुतळा बारदाना गल्लीत दोन आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत, विरम पटेल यांच्याकडे कामाला असलेल्या दोन कर्मचाऱ्यांच्या दुचाकीसह १ कोटी १५ लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर पोलिसांच्या हाती घटनेचे सीसीटीव्ही फुटेज लागले होते. त्याआधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. तेव्हा दोन्ही आरोपी पुण्याला पळून गेल्याची खात्रीलायक माहिती समजली होती. त्यानंतर नागपूर पोलिसांचे एक पथक पुण्याला रवाना झाले होते. दोघेही आरोपी इतरत्र पळून जाण्याच्या बेतात असताना पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. तर आज सकाळी त्यांना नागपूरला आणले आहे. दीपक जाट आणि नेमावर अशी आरोपींचे नावे आहेत. ते व्यापारी विरम पटेल यांच्याकडे काम करायचे. तसेच दोन्ही आरोपी हे मूळचे राजस्थानचे रहिवासी आहेत.
मंगळवारी रात्री दोन आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत एका व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यांकडून, दुचाकी आणि १ कोटी १५ लाख रुपयांची रक्कम पळवली होती. तर आज नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयित आरोपींना पुण्यातून ताब्यात घेवून नागपूरला आणले आहे. दोघेही आरोपी हे विरम पटेल यांच्याकडे कामाला होते. त्यामुळे त्यांच्याकडे आतील आणि बाहेरील सर्व माहिती त्यांना होती. या माहितीचा गैरउपयोग घेत आरोपींनी हा कट रचला होता. - गोरख भांबरे, पोलीस आयुक्त
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा सुगावा : रोकड लुटल्याची घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतूल सबनीस आणि त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी संपूर्ण परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली. त्यात लूट प्रकरणाचा संपर्क घटनाक्रम दिसून आला होता. आरोपींचे चेहरे देखील अगदी स्पष्ट दिसत असल्याने पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीना अटक केली आहे.
असा घडला होता घटनाक्रम : दिवस मंगळवार, वेळ रात्री साडे आठ ते नऊ वाजताची असेल ज्यावेळी बाजारात बऱ्यापैकी गर्दी होती. नेहरू पुतळ्या जवळील बारदाना गल्लीत विरम पटेल नामक एका व्यापाऱ्याचे दुकान आहे. त्यांनी रोजचा व्यवहार पूर्ण केल्यानंतर दुकान बंद केले आणि एक कोटी १५ लाखांची रोकडने भरलेली बॅग दोन कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केली. कर्मचाऱ्यांनी रोकड दुचाकीच्या डिक्कीत ठेवून निघाले असता काही अंतरावर एका आरोपीने त्यांची दुचाकी अडवली. आरोपीने बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी १५ लाखांची रोकड ठेवलेली दुचाकीच घेऊन पळ काढला. तसेच दीपक जाट आणि नेमावर दोघेही विरम पटेल यांच्याकडे कामाला होते. त्यामुळे त्यांच्याकडे आतील आणि बाहेरील सर्व माहिती होती. या माहिती गैरउपयोग घेत आरोपींनी हा कट रचला होता, असा खुलासा झाला आहे.
हेही वाचा -
- Chhatrapati Sambhajinagar Crime News: चोरट्यांनी भरदिवसा पळवली व्यापाऱ्याची बॅग, घटना सीसीटिव्हीमध्ये कैद
- Nanded Crime: विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीला गेलेल्या फोटोग्राफरच्या घरात दरोडा, चड्डी गँगचा कारनामा सीसीटीव्हीत कैद
- Nagpur Crime : बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याची लूट, दुचाकीसह पळवले 1 कोटी 15 लाख रुपये