ETV Bharat / state

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करा, राऊत यांच्या प्रशासनाला सूचना

author img

By

Published : May 9, 2021, 2:57 AM IST

Updated : May 9, 2021, 3:05 AM IST

महाराष्ट्रासह उपराजधानीला सुद्धा तिसऱ्या लाटेचा फटका बसू शकतो, यासाठी नागपूर शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होऊ नये, मृत्यूदर नियंत्रणात रहावा तसेच लाट थोपवण्यासाठी मास्टर प्लान तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत.

nitin Raut to nagpur administration
nitin Raut to nagpur administration

नागपूर - महाराष्ट्रासह उपराजधानीला सुद्धा तिसऱ्या लाटेचा फटका बसू शकतो, यासाठी नागपूर शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होऊ नये, मृत्यूदर नियंत्रणात रहावा तसेच लाट थोपवण्यासाठी मास्टर प्लान तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. यात आरोग्य सोयी सुविधा निर्माण कराव्यात अशा स्पष्ट सूचना ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बैठकीत दिल्या आहेत.

बैठकीत बोलताना पालकमंत्री नितीन राऊत
दुसऱ्या लाटेत कोरोना काळात मोठ्या प्रमाणात बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. या काळात बेड वाढवून 9 हजारपर्यंत पोहचले आहे. यापूर्वी पहिल्या लाटेत 1700 बेड होते. ऑक्सिजनसाठी हवाई दल व रेल्वेच्या साह्याने ऑक्सिजन आणण्यात आले. यामुळे तिसरी लाट अधिक भयंकर असणार असे तज्ज्ञांचे मत असून यासाठी महत्वाचे पाऊले उचलण्याची गरज आहे. लसीकरण कमी झालेल्या गावात अधिक रुग्ण असल्याने त्याची यादी तयार करून जनजागृती करावी.मानकापूर स्टेडियमवर 900 बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटलचे काम त्वरित करावे. जिल्ह्यात 25 ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे नियोजन करावे, जिल्ह्यात दहा ठिकाणी क्रायोजनिक ऑक्सिजन प्लांट उभारावे, ५ हजार जंबो सिलिंडर, 1 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घ्यावे. त्यामुळे प्रत्येक मोठ्या रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन पुरवठा हे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे निर्देश त्यांनी बैठकीत पालकमंत्री राऊत यांनी दिलेत.
मेडिकल आणि मेयोत आरोग्य सुविधा वाढवून खासगी रुग्णलयाचा ताण कमी करणे, ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्यातील कोविड सेंटर सक्षम करण्यासाठी उपाययोजना करणे. आंबेडकर हॉस्पिटल, ईएसआयसी, हज हाऊसचे, कोराडी, कामठी, रामटेक, मौदा,उमरेड, काटोल हॉस्पिटलचे श्रेणी वर्धन करण्यासाठी पाऊले उचलने. लहान मुलांना वाचविण्यासाठी टास्क फोर्स निर्माण करणे स्थानिक ट्रिटमेंट प्रोटोकॉल न पाळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचाही इशारा दिला आहे. जिल्ह्याच्या बॉर्डर सील करण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले आहे. पोलिसांनी पकडलेल्या रिकामटेकड्यांना 14 दिवस विलगीकारणात ठेवणे. रमजानच्या काळात घरातच सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रेमडेसिवीर आणि औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर गंभीर कारवाई, बोगस आरटीपीसीआर अहवाल देणाऱ्या प्रयोगशाळेवर कारवाई करण्याचेही निर्देश पालकमंत्री यांनी बैठकी दरम्यान प्रशासनाला दिल्या आहेत.या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, कोविड टास्क फोर्सचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Last Updated : May 9, 2021, 3:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.