ETV Bharat / state

कर्तव्यनिष्ठेपुढे सर्व समस्या गौण, कोरोनाबाधितांची सेवा करणार्‍या मोनिका खांडेकर यांच्या भावना - मोनिका खांडेकर

डॉक्टर, परिचारिका, पोलीस आणि स्वच्छता कर्मचारी हे कोरोनाविरोधातील लढ्यात पहिल्या फळीत काम करत आहेत. यातील अनेकजण त्यांच्या कुटुंबीयांपासून आणि लहान मुलांपासून दूर राहून त्यांचे कर्तव्य बजावत आहेत.

nagpur
मोनिका खांडेकर कुटुंबीयांसह
author img

By

Published : May 30, 2020, 11:54 AM IST

नागपूर - कोरोनाच्या लढाईत समाजातील प्रत्येक घटक त्यांच्यापरीने योगदान देत आहे. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिकांचा सहभाग सर्वात महत्वाचा आहे. नागपुरातील एका परिचारिकेने दीड वर्षाच्या चिमुकल्यासह दोन पिल्लांना घरी सोडून तब्बल 14 दिवस रुग्णालयात सेवा दिली. दिलेले कार्य पूर्णत्वास गेल्यानंतर ज्यावेळी ती माता घरी परतली, तेव्हा आपल्या लहान चिमुकल्याला बघून अश्रू अनावर झाले होते. मोनिका खांडेकर असे या परिचारीकेचे नाव आहे.

मोनिका खांडेकर या नागपूरच्या मेयो रुग्णालयात स्टाफ नर्स आहेत. मोनिकाला दीड वर्षाचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी आहे. त्या गेली 14 दिवस कर्तव्य बजावत होत्या. मोनिका यांना छोटे बाळ असल्याने त्या बाळापासून दूर राहू शकतील का, असा प्रश्न त्यांच्या घरच्यांनासुद्धा पडला होता. मात्र मोनिका यांच्या निर्धारापुढे सर्व समस्या सुटत गेल्या, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

डॉक्टर, परिचारीका, पोलीस आणि स्वच्छता कर्मचारी हे कोरोनाविरोधातील लढ्यात पहिल्या फळीत काम करत आहेत. यातील अनेकजण त्यांच्या कुटुंबीयांपासून आणि लहान मुलांपासून दूर राहून त्यांचे कर्तव्य बजावत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.