नागपूर - वाढत्या रुग्णससंख्येला रोखण्यासाठी नागपुरात शनिवारी आणि रविवारी कर्फ्यू पाळला जात आहे. मात्र, तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. नागपूरमध्ये शनिवारी 984 रुग्ण आढळले असून 10 जणांचा मृत्यू झाला. पूर्व विदर्भात 1 हजार 277 रुग्णांची नोंद झाली असून 11 जणांचा मृत्यू झाला.
तीन दिवस चाचण्यांचा उच्चांक -
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. एका दिवसात सर्वाधिक कोरोना चाचण्या करण्याच्या उच्चांक गाठण्यात आला. नागपूरमध्ये शुक्रवारी 12 हजार 396 चाचण्या करण्यात आल्या. शनिवारी 13 हजार 27 चाचण्या झाल्या. यामध्ये 9 हजार 743 या आरटीपीसीआर तर 3 हजार 284 या अँटिजेन आहेत. गेल्या तीन दिवसात चाचण्यांचा विक्रम झाला.
आठवड्यात 97 लोकांचा गेला जीव -
दररोज शहरात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शनिवारी शहरात 734 तर ग्रामीणभागात 247 रुग्णांची भर पडली आहे. या आठवड्यात बाधित रुग्ण्यांच्या संख्येत 6 हजार 382 जणांची भर पडली आहे तर ९७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत एकूण 4 हजार 330 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पूर्व विदर्भात 1 हजार 277 रुग्ण व 11 जणांचा मृत्यू -
पूर्व विदर्भात नागपूर 984, वर्ध्यात 169, चंद्रपूर 46,भंडारा 40, गोंदिया 22 तर गडचिरोली येथे 16 रुगांची भर पडली. यात नागपूर जिल्ह्यात 10 जणांचा मृत्यू तर वर्ध्यात 1 असा एकूण 11 जणांचा मृत्यू झाला. तर 1 हजार 19 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.