ETV Bharat / state

चिंताजनक..! नागपुरात नवीन वर्षात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा मोठा - नागपूर कोरोना मृत्युमुखी संख्या

नागपुरात गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सुरू झालेला कोरोनाचा प्रवास वर्षाअखेर मंदावला होता. मात्र, बेजबाबदार नागरिकांच्या वागणुकीमुळे पुन्हा कोरोनाची गती वाढली आहे. सध्या ज्या गतीने नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढीस लागली आहे ते बघून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात धडकी भरली आहे.

नागपूर
नागपूर
author img

By

Published : Mar 13, 2021, 5:24 PM IST

नागपूर - कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत असून या वर्षाचा विचार केला तर १ जानेवारी ते १२ मार्चच्या कालावधीत तब्बल ५०० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे याच कालावधीत तब्बल ४१ हजार ८२३ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आकडे पुढे आले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जानेवारी महिन्यात सरासरी चार हजार ते साडे चार हजार तपासण्या केल्या जायच्या, मात्र आता हा आकडा तब्बल १० ते १२ हजारांच्या घरात गेला असल्याने कोरोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत आहे, मात्र मृत्यूचे वाढत असलेले आकडे चिंता वाढवणारे आहेत.

नागपूर

उपराजधानी नागपुरात गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सुरू झालेला कोरोनाचा प्रवास वर्षाअखेर मंदावला होता. मात्र, बेजबाबदार नागरिकांच्या वागणुकीमुळे पुन्हा कोरोनाची गती वाढली आहे. सध्या ज्या गतीने नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढीस लागली आहे ते बघून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात धडकी भरली आहे. प्रशासनाचे नियोजन फसल्याचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो.

११ मार्च २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण

गेल्यावर्षी मार्च महिन्यातच नागपुरात कोरोना विषाणूचे आगमन झाले होते. ११ मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण पुढे आल्यानंतर प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला. आता कसं होईल, काय करावं, काय करू नये अशा शेकडो प्रश्नांच्या गर्तेत सर्वसामान्य नागपूरकर अडकलेले असताना २५ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात संचारबंदी लागू केली. त्यानंतर देखील नागपूरसह संपूर्ण देशात कोरोनाचा उद्रेक झाला होता. ११ मार्च ते ३१ डिसेंबर दरम्यान नागपुरातील रुग्णसंख्या १ लाख २३ हजार ७६७ इतकी झाली होती. तर त्यानंतर या वर्षाच्या ७१ दिवसांमध्ये ४१ हजार ८२३ इतकी झाली आहे.

७१ दिवसात ५०० लोकांचा मृत्यू

कोरोनाबाधित रुगणांची संख्या वाढत असताना नागपूरमध्ये मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. १ जानेवारीला नागपुरात ३९४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती तर १२ मार्च रोजी हा आकडा ४४४० इतका झाला आहे. याचाच अर्थ असा होती की १ जानेवारी २०२१ ते १२ मार्च २०२१ दरम्यानच्या ७१ दिवसांमध्ये नागपुरात तब्बल ५०० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या मृतकांमध्ये नागपूर शहरातील नागरिकांचा समावेश सर्वाधिक आहे. तर मृतकांमध्ये जिल्ह्या बाहेरील रुग्णाचा सुद्धा लक्षणीय आहे.

तपासणीची संख्या झाली दुप्पट

गेल्या वर्षीच्या शेवटी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने तपासणीसुद्धा कमी करण्यात आली होती. डिसेंबर महिन्यात सरासरी चार ते साडेचार हजार कोरोना चाचण्या केल्या जायच्या मात्र आता हाच आकडा दहा ते १२ हजारांच्या घरात गेला आहे.

हेही वाचा - सचिन वझेंच्या 'त्या' व्हाटसअ‌ॅप स्टेटस संदर्भात माहिती घेऊन बोलतो - गृहमंत्री अनिल देशमुख

हेही वाचा - वीज बिल माफीसाठी 19 मार्चला राज्यभर महामार्ग रोको आंदोलन; राजू शेट्टींची माहिती

हेही वाचा - तपास चालू असताना विरोधकांकडून अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी तगादा लावणं चुकीचं - मंत्री उदय सामंत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.