नागपूर - देशातील पाच राज्यात निवडणुका होऊ घातलेल्या आहे. मात्र, निवडणूक आयोग ( Election Commission ) हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करते, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी केला. तसेच याबाबत सर्वांना माहित झाले आहे, असेही ते म्हणाले. ते नागपुरात त्यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ( Nana Patole with Media in Nagpur ) राज्यात जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होऊ नये, असा ठराव कॅबिनेटमध्ये मंजूर आहे. मात्र, असे असतानाही निवडणूक घोषित करण्यात आली. ( Nana Patole on Election Commission )
महाराष्ट्र पोलीस सक्षम -
राज्यातील काँग्रेसचे 15 आमदार हे नाराज आहेत. ते हायकमांडला भेटायला जाणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, हायकमांडला भेटायला जाणे यात काही गैर नाही. सध्या काँग्रेस पक्ष हा एकजुटीने काम करत आहे. पक्षातील आमदार नाराज असल्याचे माझ्यापर्यंत अजुन काहीही आले नाही, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आतंकवादी संघटनेकडून रेकी झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र पोलीस कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा विषय गंभीर आहे. यात काँग्रेस पक्षही त्याला गांभीर्याने घेत आहे. देशाने आधीच दोन पंतप्रधान गमावले आहे. त्यामुळे दिवंगत इंदिरा गांधी असो की राजीव गांधी यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचे आणि देशाचे मोठे नुकसान झाले आहे, असेही ते म्हणाले. ऐनवेळी पंतप्रधानांच्या दौऱ्यात बदल करण्यावर नाना पटोले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. यासोबत पंतप्रधान यांची गाडी थांबली असताना भाजपचे कार्यक्रते झेंडे घेऊन काय करत होते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत नाही का? पंतप्रधानांच्या सुरक्षेत उणीव असणे ही गंभीर बाब असल्याचे ते म्हणाले. त्याला उत्तर कसे द्यायचे हे आम्हाला माहीत आहे.
हेही वाचा - Reiki In Nagpur : तो तरुण नागपूरच्या सीताबर्डी परिसरात राहिला होता...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. केंद्रात भाजपचे सरकार आहे त्यामुळे कोणावरही सीबीआय, ईडी, लावू शकतात, गुन्हे दाखल करू शकतात. भारतात लोकशाही आहे. आम्ही लोकशाहीला माननारे आहोत. त्यांना उत्तर कसे द्यायचे हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देऊ. भाजपची नौटंकी करत असल्याचे जनतेला माहीत झाले आहे. काँग्रेस पक्ष निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयार आहे. देशभरात भाजपच्या केंद्र सरकार विरोधात परिवर्तनाची लहर तयार झालेली आहे. भाजप सरकार महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आणि प्रश्न गरिबांचे प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने नौटंकी करत असल्याचे जनतेला आता समजले आहे.
देशात महिलांचा अपमान होणे चुकीचे असून त्याचा आम्ही निषेध करतो. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे विरोधात जे पोस्ट भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकले हे चुकीचे आहे. महिलांच्या बाबतीत कोणी विकृत पद्धतीने वक्तव्य किंवा बोलत असेल तर त्याचा काँग्रेस पक्ष निषेध करते, अशी भूमिका त्यांनी मांडली.