ETV Bharat / state

Deshmukh Met Bawankule : काँग्रेसचे बंडखोर नेते आशिष देशमुखांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट - Ashish Deshmukh met Chandrasekhar Bawankule

काँग्रेसचे निलंबित आणि बंडखोर नेते आशिष देशमुख यांनी आज (सोमवारी) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपुरातील घरी भेट घेतली आहे. यावरून अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. आशिष देशमुख भाजपमध्ये घरवापसीसाठी प्रयत्न करत आहेत अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. या भेटीतून नवीन राजकीय समीकरण उदयास येणार का? यादृष्टीने बघितले जात आहे.

Ashish Deshmukh Met Bawankule
आशिष देशमुख
author img

By

Published : Apr 24, 2023, 3:48 PM IST

देशमुख-बावनकुळे भेटीवर प्रतिक्रिया देताना आशिष देशमुख

नागपूर: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आशीष देशमुखांनी त्यांच्यावर जाहीरपणे टीका केली होती. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी देशमुखांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावून निलंबित केले होते. आशिष देशमुख हे बावनकुळेंच्या भेटीला आल्याने नवीन राजकीय समीकरण उदयास येणार का? असे त्यांना विचारले असता ते म्हणाले की, बावनकुळे यांच्या निमंत्रणावर मी नाश्त्याला आलो आहे. यामागे कोणतीही राजकीय भूमिका नाही. काँग्रेस पक्ष सोडून आशिष देशमुख भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. यावर त्यांनी स्पष्टपणे नकार दिला.

मला पक्षातून काढणार नाही: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांनी ओबीसी समाजाची जाहीर माफी मागावी, अशा प्रकारचे वक्तव्य आशिष देशमुखांनी केले होते. याचबरोबर पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मी पक्षातून निलंबित असलो तरी पक्ष माझ्यावर बडतर्फीची कारवाई करणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

'या' ठिकाणांहून लढण्यास इच्छुक: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यातील हिंगणा किंवा काटोल या दोन मतदारसंघांपैकी एक काँग्रेसच्या वाट्याला आल्यास मी लढण्यास तयार असल्याचे देखमुख म्हणाले. यावेळी आशीष देशमुख यांच्या मतदारसंघात विकास कामे करून घेण्यासाठी त्यांनी माझी भेट घेतली, असे स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिले आहे. यामागे राजकीय हेतू नाही, असे देखील ते म्हणाले.

नाना पटोलेंचे 'नो कमेंट्स': आशिष देशमुख आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीने राजकीय चर्चा रंगत असली तरी यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

तर पटोलेंची उचलबांगडी करावी: बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप केल्यानंतर माजी कॉंग्रेस नेते आशिष देशमुख यांनी 6 फेब्रुवारी, 2023 रोजी नाना पटोलेंवर टीका केली होती. नाना पटोलेंवर गंभीर आरोप झाले आहेत. या आरोपांची चौकशी होईपर्यंत त्यांनी पदापासून दूर राहावे, अन्यथा पक्षश्रेष्टींनी त्यांची उचलबांगडी करावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे.

हेही वाचा: Fire in Nagpur : हिंगणा एमआयडीसीतील भीषण आगीत तिघांचा जळून मृत्यू, आणखी १० ते १२ कामगार अडकल्याची भीती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.