ETV Bharat / state

लखीमपूर खीरी प्रकरण : उपराजधानीत कॉंग्रेसकडून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध - योगी आदित्यनाथ यांच्या फोटो बॅनर जाळले

उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये केंद्र सरकारच्या कृषी कायद्याचा विरोधात आंदोलन सुरू होते. मागील अनेक दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेले आंदोलनाला उत्तर प्रदेशमध्ये भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे आंदोलन सरकारला थोपवता आले नसल्याने हा नरसंहार घडल्याचा आरोप कॉंग्रेसकडून केला जात आहे. या विरोधात युवक काँग्रेसकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. या विरोधात नागपूरच्या सक्करदरा चौकात काँग्रेसचे नेते गिरीश पांडव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलन
आंदोलन
author img

By

Published : Oct 4, 2021, 7:41 PM IST

Updated : Oct 4, 2021, 7:50 PM IST

नागपूर - उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या घटनेचे पडसाद देशभरात दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उपराजधानी नागपुरात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातील सक्करदरा चौकात युवक कॉंग्रेसकडून घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटो बॅनरला चपला मारून घटनेचा निषेध करण्यात आला.

उपराजधानीत कॉंग्रेसकडून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध
उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये केंद्र सरकारच्या कृषी कायद्याचा विरोधात आंदोलन सुरू होते. मागील अनेक दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेले आंदोलनाला उत्तर प्रदेशमध्ये भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे आंदोलन सरकारला थोपवता आले नसल्याने हा नरसंहार घडल्याचा आरोप कॉंग्रेसकडून केला जात आहे. या विरोधात युवक काँग्रेसकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. या विरोधात नागपूरच्या सक्करदरा चौकात काँग्रेसचे नेते गिरीश पांडव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रतिमेला चपला मारत निषेध करण्यात आला. हे फलक जाळण्याच्या बेतात असतांना पोलिसांनी आंदोलकांच्या हातातून फलक ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकानी केंद्रसरकारचा विरोधात जोरदार घोषणा देते धरणे दिले. या आंदोलनात दक्षिण नागपूर ब्लॉक काँग्रेस कमेटी, महिला काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, एनएसयूआय सेवादलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला.

हेही वाचा - 'उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीचे तालिबानी राज'

हेही वाचा - बाबू गेनूला इंग्रजांनी चिरडून मारले, तसेच लखीमपूरमध्ये भाजप सरकारचे कृत्य -संजय राऊत

Last Updated : Oct 4, 2021, 7:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.