नागपूर: रिझर्व बँकेने २ हजाराच्या नोटा सप्टेंबरनंतर चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काळ्या पैशाचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात असले तरी या मुद्द्यावर सुद्धा राजकारण तापले आहे. राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या नोटबंदी कुठल्या उद्देशाने केली हे लक्षात घेतले पाहिजे. केंद्र सरकारच्या जवळ असलेल्या उद्योगपती मित्रांना फायदा व्हावा याकरिता हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
काळा पैसा पांढरा करण्यासाठीच नोटबंदी: ज्या नोटा चालनात आलेल्या होत्या, त्या आठ लक्ष कोटी इतक्या होत्या. म्हणजे प्रत्यक्षात व्यवहारामध्ये आणि चलनामध्ये 10 टक्के दोन हजाराच्या नोटा होत्या. अशा परिस्थितीमध्ये या नोटा गेल्या कुठे, कुठे डम्प झाल्यात तर सगळ्या मोठ्या कॉर्पोरेट सेक्टरच्या लोकांनी या नोटा डम्प केल्या आहेत, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर काळा पैसा पांढरा करण्यासाठीच नोटबंदी केली असावी. सामान्य माणसाकडे दोन हजारांच्या नोटा नाही. मार्केटमध्ये या नोटा दिसत नाही, त्या गायब झालेल्या आहेत. या नोटा विशिष्ट लोकांनी गोळा करून ठेवलेल्या आहे. आता त्या नोटा को-ऑपरेटिव्ह बँके आणि पतसंस्थेच्या माध्यमातून नोटा वाईट केल्या जाण्याची दाट शक्यता आहे.
मित्रमंडळीना खुश करण्यासाठी निर्णय: नोटबंदीचा फायदा थेट सरकारच्या जवळच्या लोकांना होईल. अशा प्रकारचे प्रयोजन करून नोटबंदीचा निर्णय केला असावा असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. नोटबंदीचे सामान्य लोकांची काही देणंघेणं राहिलेल नाही. कारण त्याच्याकडे ह्या नोटा अजिबात शिल्लक नाही. केवळ सरकारच्या मित्रमंडळीना खुश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले आहे.
मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही: मंडळाचा विस्ताराच्या गोष्टी चाललेल्या आहेत यामध्ये मला सत्य वाटत नाही. आताची स्थिती कोणाला ही दुखावण्याची नाही अशीच आहे. कारण मंत्रिमंडळात कुणाला घेणार, कोणाला सोडणार. बाशिंग बांधून सर्वच नवरदेवचे उभे झालेले आहे. मात्र, तेवढ्या नव्या शिल्लक नाही आहे. त्यामुळे नवरदेव जास्त आणि नवरी कमी अशी परिस्थिती असल्याची टीका त्यांनी केली आहे. नवरीच्या ओढामुळे सध्याच्या सरकारचे बेतालपणे वागणे सुरू आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार हा पुन्हा एक नवा चाकलेट किंवा लालीपॉप ठरेल असे ते म्हणाले.
आशिष देशमुख फडणवीस भेट : काँग्रेसचे बंडखोर नेते आशिष देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, राजकारणात नवीन मैत्री होत असावी असे मला वाटते. कारण काल सावनेर मध्ये सुनील केदार यांच्या मतदारसंघात सभा झाली. त्यावेळेस ती सभा तिथला उमेदवार आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती, असा त्याचा अर्थ आहे. त्या ठिकाणी पर्याय शोधण्याचा काम सुरू असेल आणि पर्याय त्यांच्याकडे नाही, त्यामुळे बाहेरचा पर्याय आणून पुन्हा उभे करायचे कदाचित त्यांचा प्रयत्न असावा, असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा -