नागपूर - उपराजधानी नागपूरामध्ये नवे शेतकरी कायद्ये आणि वाढत चाललेल्या महागाई विरोधात कॉंग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राजभवनाला घेराव घालण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली समिती तयार -
हे सरकार भांडवलदारांचे असून नेमके कोणासाठी काम करत आहे, हेच कळत नाही. हे कायदे शेतकऱ्यांसह जनतेकरिता मारक आहे. तसेच शेतकरी थकले पाहिजे यासाठी 10 दिवसांच्या अंतरावर बैठक घेतल्या जात आहे. कुठेतरी यात केंद्र सरकारचा हेतू शुद्ध नाही. त्यामुळे काहीतरी चुकीचे सुरु असल्याचा नागरिकांना जाणवत असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाबाळासाहेब थोरात यांनी दिली. शेतकऱ्यांसाठी या कायद्यात राज्यपातळीवर मदत करता येईल, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली समिती तयार करण्यात आली आहे. यात शेतकऱ्यांच्या मदतीचे कायदे असेल, हा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
दिल्लीतील सरकार हे गेंड्याच्या कातडीचे -
संसदेला घेराव घालण्याचा ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. आजपर्यंत ज्या वेळी विदर्भातून आंदोलन केले गेले. त्यावेळी केंद्रात सरकार पडले आहे. 1978 नंतर इंदिरा गांधी यांनीं विदर्भाचा दौरा केला. तसेच 2000 साली नागपूरमध्ये सोनिया गांधी यांची कस्तुरचंद पार्कमध्ये सभा झाली होती. सोनिया गांधीेनी आवाज बुलंद केला आणि केंद्रातील वाजपेयींचे सरकार पडले. आता तीच वेळ पुन्हा आली असल्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले. दिल्लीतील सरकार हे गेंड्याच्या कातडीचे आहे. पण या आंदोलनाच्या माध्यमातून त्याला बळ देण्याचे काम करायचे आहे. विदर्भातील हे आंदोलन नक्कीच मोदी सरकारला घरी बसल्याशिवाय राहाणार नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - जाणून घ्या भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' लस निर्मितीचा प्रवास