नागपूर - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील अनेक शहरात नागरिकांनी घराबाहेर पडताना तोंडावर मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. तोंडावर मास्क न घालता बाहेर पडणाऱ्या अशा ९ जणांवर नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राज्यातील ही पहिलीच कारवाई ठरली आहे.
सदर कारवाईबरोबरच संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या ३४ व्यक्तींवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले होते. या सर्वांविरुद्ध जलदगतीने दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्यावर न्यायालयाने देखील तत्काळ कारवाई करत या ३४ व्यक्तींना शिक्षा सुनावली आहे. कोरोनाच्या संकटात पोलिसांनी केलेली कारवाई व न्यायालयाने दाखवलेली तत्परता यामुळे हा कौतुकाचा विषय ठरत आहे.
हेही वाचा- नागपूरमध्ये लॉकडाऊन कालावधीत वाहतूक विभागाकडून नऊशे वाहनं जप्त