नागपूर - जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते आशिष जैस्वाल यांची भाजपचे उमेदवार आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
हेही वाचा - बीडमध्ये शेख शफीक औरंगाबादची पुनरावृत्ती करणार - ओवैसी
रामटेक मतदारसंघाचे विद्यमान आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या आई आणि पत्नीबाबत आशिष जैस्वाल यांनी अशोभणीय वक्तव्य केले असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. या वक्तव्यामुळे रेड्डी यांच्या घरातील महिलांची बदनामी झाल्याचीही तक्रारीत म्हटले आहे. रामटेक विधानसभेसाठी युतीकडून आशिष जैस्वाल यांना उमेदवारी मिळेल असा विश्वास असताना भाजपचे विद्यमान आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आशिष जैस्वाल हे अपक्ष म्हणुन निवडणूक लढवणार आहेत.
हेही वाचा - 'मी पळून न जाता बाजीप्रभूप्रमाणे खिंड सांभाळतोय'