नागपूर - महाराष्ट्रातील वाघांच्या नसबंदीबाबत प्रस्ताव असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. मात्र, आज मुख्यमंत्र्यांसोबत पार पडलेल्या वनमंडळाच्या बैठकीत वाघांच्या नसबंदीबाबत कोणतेही प्रस्ताव नसल्याचे या बैठकीत उपस्थित असलेले मानद वन्यजीव संरक्षक कुंदन हाते यांनी सांगितले. शिवाय वाघ आणि मानव यांच्यातील संघर्षाला आळा घालण्यासाठी व वाघांचे स्थलांतर करण्यातबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे हाते म्हणाले. त्याचबरोबर वाघांची नसबंदी हा शेवटचा पर्याय असल्याचे या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे हातेंनी सांगितले. त्यामुळे फक्त वाघांच्या स्थलांतरावरच या बैठकीत चर्चा झाल्याचे कुंदन हाते यांनी सांगितले.
वाघांच्या नसबंदीबाबत विविध चर्चांना उधान आल्याचे पहायला मिळत आहे. मात्र, आज मुख्यमंत्र्यांसोबत पार पडलेल्या वन विभागाच्या बैठकीत या विषयाला पूर्णविराम लावण्यात आला आहे. वाघांची नसबंदी हा शेवटचा पर्याय असेल असे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितल्याचे मानद वन्यजीव संरक्षक कुंदन हाते म्हणाले. शिवाय ही बैठक वाघांच्या स्थलांतराबाबत झाली असल्याचेही हाते यांनी सांगितले. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील बफर क्षेत्रातील वाघांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता व मानव वन्यजीव संघर्ष पाहता यामुळे वाघांचे स्थलांतर करणे हे अत्यंत गरजेचे असल्याचे या बैठकीत निष्पन्न झाल्याचेही हाते यांनी सांगितले. शिवाय या बैठकीत वाघांचे स्थलांतर करण्यापूर्वी ज्या जंगलात स्थलांतर करणार आहोत, त्याचे अभ्यास करूनच तसे निर्णय घ्यावे. असेही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले. त्यामुळे स्थलांतरा बरोबरच पुर्नवसन हा या बैठकीचा प्रस्ताव असल्याचे यावेळी कुंदन हाते यांनी सांगितले.
गडचिरोलीसारख्या मोठ्या जंगलात वाघांचे स्थलांतर करण्याच्या मुद्यावर देखील यात चर्चा झाली. मात्र, त्या जंगलाचा पूर्णतः अभ्यास करूनच तसे निर्णय घेतले जावे अशी चर्चाही बैठकीत झाल्याचे यावेळी हाते यांनी सांगितले. त्यामुळे अभ्यासगट बनवून व समिती स्थापन करूनच पुढील पाऊलं उचलण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या असल्याचे हाते यांनी सांगितले. त्यामुळे नसबंदी हा सगळ्यात शेवटचा पर्याय असेल असेही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत स्पष्ट केले असल्याचे मत कुंदन हाते यांनी सांगितले.