ETV Bharat / state

CM Eknath Shinde On Barsu : बारसू येथील भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच पुढील कारवाई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - CM Eknath Shinde On Barsu

बारसूतील भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेऊ. इथल्या लोकांवर दबावतंत्राचा वापर करणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते नागपूरमध्ये बोलत होते. बारसू रिफायनरी प्रकल्पावरून सध्या राजकारण सुरू आहे. यावर आज मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती
author img

By

Published : Apr 27, 2023, 6:39 PM IST

प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर: बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात संघर्ष तीव्र झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला आहे. जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा असा सल्ला त्यांनी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. राज्यात कुठलाही प्रकल्प लोकांवर अन्याय करून किंवा बळजबरीने प्रकल्प पुढे रेटण्याचा आम्ही प्रयत्न करणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन कारवाई: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या वेळी सुद्धा सुरुवातीला लोकांकडून तीव्र विरोध करण्यात आला मात्र, त्यानंतर लोकांना समृद्धी मार्गाचे महत्व पटल्यानंतर लोकांनीचं स्वतःहून जमीनी देण्याची तयारी दर्शवली होती. त्याचप्रमाणे बारसू येथील भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच पुढील कारवाई केली जाईल. अनेकांनी जमीन देण्यास सकारात्मकता दर्शवली आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. आत्ता केवळ सोईल टेस्टिंग सुरू झाली आहे. ती जागा प्रकल्प होण्यासाठी उपयुक्त आहे की, नाही हे देखील माहिती नाही. सोईल टेस्टिंग नंतर रिफायनरी प्रकल्पाचे काम सुरू होण्यासाठी बरीच प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

उद्धव ठाकरे यांचे केंद्राला पत्र: रिफायनरी प्रकल्पासाठी बारसूची जागा दिल्याचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्राला पाठवल्याचे समोर आले. शिवसेना शिंदे गट, भाजप यांनी ठाकरेंची यावरून कोंडी करायचा प्रयत्न केला. बारसू रिफायनरीबाबत केंद्राकडून वारंवार विचारणा होऊ लागल्यानंतर, प्राथमिक अहवाल मागवला. मात्र, प्रकल्प राबवला नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगत पत्राबाबत आज मौन सोडले. भारतीय कामगार सेनेच्या 55 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठाकरे बोलत होते.

बारसूचा प्रकल्पाबाबद दपशाही : नाणार रिफायनरीला कडाडून विरोध झाल्यानंतर बारसूच्या जागेचा प्रस्ताव मी केंद्राकडे पाठवला होता. परंतु, अडीच वर्षात पोलिसांच्या बळावर तो प्रकल्प राबवला नाही. मात्र गद्दारी करून भाजपने सरकार पाडले. आरे कारशेड, कांजूरमार्ग, बुलेट ट्रेनचा प्रकल्प ज्या पद्धतीने फिरवला तसाच बारसूचा प्रकल्प देखील दडपशाहीने राबवला जात आहे. राज्याच्या मुळावर येणारे विषय मी अडवून ठेवले. त्यामुळेच सरकार पाडण्यात आल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

हेही वाचा: Uddhav Thackeray On Barsu Refinery बारसूबाबत पत्रावर उद्धव ठाकरेंनी सोडले मौन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.