नागपूर - भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट नागपूर येथील संघ मुख्यालयात दाखल झाले. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी त्यांची जवळपास सव्वा तास चर्चा झाली. सत्ता स्थापनेचा पेच असल्यामुळे यातून बाहेर निघण्यासाठी फडणवीस यांनी भागवत यांचे मार्गदर्शन घेतल्याचे बोलले जात आहे. भेटीनंतर माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता ते पुन्हा मुंबईला रवाना झाले.
-
Nagpur: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis reaches RSS Headquarters to meet RSS Chief Mohan Bhagwat. (File pics) pic.twitter.com/zQctbh6Awi
— ANI (@ANI) November 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Nagpur: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis reaches RSS Headquarters to meet RSS Chief Mohan Bhagwat. (File pics) pic.twitter.com/zQctbh6Awi
— ANI (@ANI) November 5, 2019Nagpur: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis reaches RSS Headquarters to meet RSS Chief Mohan Bhagwat. (File pics) pic.twitter.com/zQctbh6Awi
— ANI (@ANI) November 5, 2019
राज्यात आता सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये फडणवीस हेच राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असा ठराव करण्यात आला.
हेही वाचा - 'सोनिया गांधींशी झालेल्या भेटीत आमचं काहीही ठरलेलं नाही'
बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी.
या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय गोपनीय पद्धतीने नागपूरच्या संघ मुख्यालयात दाखल झाले. सत्ता स्थापनेचा पेच गेल्या तेरा दिवसांपासून सुरू असल्याने संघाने यामध्ये हस्तक्षेप करून नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करावा यासंदर्भात शिवसेनेकडून सरसंघचालक मोहन भागवत यांना विनंती केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयात गेले.