ETV Bharat / state

नागपुरातील 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष' पुन्हा सुरू

सत्ता संघर्षामुळे कार्यालय बंद पडले होते. त्यामुळे गरीब रुग्णांची मोठी अडचण होऊ लागली होती. या संदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयातील वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

author img

By

Published : Dec 19, 2019, 11:19 PM IST

chief-ministers-medical-assistance-fund-restart-in-nagpur
नागपुरातील 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष' पुन्हा सुरू

नागपूर - सत्ता स्थापनेवरून झालेल्या गदारोळानंतर राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटी दरम्यान नागपूर येथील मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष कार्यालय बंद करण्यात आले होते. त्यामुळे विदर्भातील गरीब रुग्णांची प्रचंड गैरसोय होऊ लागली होती. 'ईटीव्ही भारत'सह प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर वैद्यकीय सहायता निधी कक्ष पुन्हा सुरू करण्यात आला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिल्यानंतर सहायता निधी कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा- IPL Auction २०२० : लिलावाला सुरूवात, मुंबईच्या संघात हा धडाकेबाज फलंदाज

सत्ता संघर्षामुळे कार्यालय बंद पडले होते. त्यामुळे गरीब रुग्णांची मोठी अडचण होऊ लागली होती. या संदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयातील वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या कार्यालयात इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय (मेयो) चे वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनपुरे हे काम पाहणार आहेत. या शिवाय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षासाठी नागपूर विभागीय आयुक्त, उपसंचालक आरोग्य सेवा आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांची समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. या कक्षामध्ये गरजू रुग्णांचे अर्ज स्वीकारण्यात येतील व ही समिती त्या रुग्णांना देण्यात येणारे अर्थसहाय्य विहीत निकषानुसार निश्चित करणार आहे.

Intro:सत्ता स्थापने वरून झालेल्या गदारोळ नंतर राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटी दरम्यान नागपुर येथील मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष कार्यालय बंद करण्यात आले होते...सत्ता संघर्षांत मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष कार्यालय बंद झाल्याने विदर्भातील गरीब रुग्णांची प्रचंड गैरसोय होऊ लागली होती, ईटीव्ही भारत सह प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष पुन्हा सुरू करण्यात आले आहे,या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर सहायता निधी कार्यालय सुरु करण्यात आले आहे Body:राज्यात सत्ता कोणत्याही पक्षाची सत्ता स्थापन होऊ न शकल्यामुळे मध्यंतरी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती...दरम्यान त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष बंद करावे लागले होते,सत्ता संघर्षामुळे कार्यालय बंद झाल्यामुळे गरीब रुग्णांची मोठी अडचण होऊ लागली होती...या संदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत...या कार्यालयात इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालया(मेयो) चे वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनपुरे हे काम पाहणार आहेत....या शिवाय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षासाठी नागपूर विभागीय आयुक्त, उपसंचालक आरोग्य सेवा आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांची समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. या कक्षामध्ये गरजू रुग्णांचे अर्ज स्वीकारण्यात येतील व ही समिती त्या रुग्णांना द्यावयाचे अर्थसहाय्य विहित निकषानुसार निश्चित करणार आहे. Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.