ETV Bharat / state

नागपुरातून अपहरण झालेल्या मुलाची मध्य प्रदेशमधून सुटका, मजूर जोडप्याला अटक होऊनही अपहरणाचे कारण  गुलदस्त्यात!

Couple kidnapped minor boy from Nagpur : अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणात नागपूर पोलिसांना मोठं यश मिळालंय. नागपूरच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कळमेश्वर पोलिस स्टेशन आणि छिंदवाडा पोलिसांच्या मदतीनं मुलाला ताब्यात घेतलंय. मध्य प्रदेशातील छिंदवाड्याहून नागपुरात मोलमजुरी करण्यासाठी आलेल्या दाम्पत्यानं मुलाचं अपहरण करून छिंदवाडा इथं लपवून ठेवलं होतं.

Couple kidnapped minor boy from Nagpur
Couple kidnapped minor boy from Nagpur
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 9:39 AM IST

Updated : Nov 22, 2023, 9:50 AM IST

कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रभारी उमेश गोल्हानी

छिंदवाडा (मध्य प्रदेश) Couple Kidnapped Minor Boy From Nagpur : नागपूर जिल्ह्यातून 12 वर्षीय अल्पवयीनं मुलाचं अपहरण करुन मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथं लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून मुलाला सुखरुप बाहेर काढलंय. याप्रकरणात नागपूर गुन्हे शाखेच्या पथकानं दोन्ही आरोपींना अटक केलीय. पोलिसांनी आरोपींना नागपूरला आणलं असून तिथं त्यांची चौकशी केली जाणार आहे.

बेपत्ता झाल्याची नोंद : कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रभारी उमेश गोल्हानी म्हणाले की, "नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या परिसरातून एका 12 वर्षीय अल्पवयीन बेपत्ता झाला होता." त्याच्या अपहरणाची तक्रार कळमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. गुन्हे शाखा आणि कळमेश्वर पोलिसांनी कोतवाली पोलिस स्टेशन छिंदवाडा पोलिसांच्या मदतीनं या मुलाला ताब्यात घेतलंय. दोन दिवसांपूर्वी कळमेश्वर येथील 12 वर्षांचा मुलगा हरवल्याची तक्रार पोलिसांत पोहोचली असता मूल अल्पवयीन असल्यानं पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. अपहरणाचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी हे प्रकरण नागपूर गुन्हे शाखेकडं सोपवलं. त्यांच्या मदतीनं आरोपीचं छिंदवाडा येथील लोकेशन सापडलं.

जोडप्यानं केलं होतं अल्पवयीन मुलाचं अपहरण : मंगळवारी नागपूर गुन्हे शाखा आणि कळमेश्वर पोलीस ठाणे छिंदवाडा इथं पोहोचले. पोलिसांनी कोतवाली पोलिस ठाण्याच्या मदतीनं आरोपीच्या मिळालेल्या ठिकाणी छापा टाकून कळमेश्वर इथून अपहरण झालेल्या बालकाला ताब्यात घेतलंय. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपी प्रवीण पंडाग्रे आणि एक महिलेलाही अटक केलीय. दोन्ही आरोपी छिंदवाडा जिल्ह्यातील दमुआ येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. गुन्हे शाखेच्या पथकानं मुलासह दोन्ही आरोपींना नागपूरला नेलं.

पुरुष आणि महिला मजूर म्हणून नागपुरात गेले होते : छिंदवाडा जिल्ह्यातील दमुआ येथील रहिवासी असलेले दोघंही आरोपी दाम्पत्य नागपुरात मजुरीचं काम करण्यासाठी गेले होते. प्राथमिक चौकशीत त्यांनी पोलिसांना सांगितलं की, हा मुलगा तो ज्या भागात मजूर म्हणून काम करत असे, त्याच भागात त्याची भेट झाली. त्यांनी त्या मुलाला आपल्या बोलण्यात फसवून छिंदवाड्याला आणलं. या प्रकरणात आरोपींनी खंडणीची कोणतीही मागणी केलेली नाही. तसंच मुलाचं अपहरण का केलं, याची नागपूर गुन्हे शाखा चौकशी करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. 'तू मटण खाऊन आला म्हणून भारत मॅच हरला' म्हणत मोठ्या भावानं केला लहान भावाचा खून
  2. गावगुंडाचं क्रौर्य, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून दिले सिगारेटचे चटके; मुंडणही केलं
  3. फटाक्याचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, नराधमाला बेड्या

Last Updated : Nov 22, 2023, 9:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.