नागपूर - पूर्व विदर्भात पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली. मात्र, ही मदत अत्यंत कमी आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून पूरग्रस्तांची थट्टा केली जात आहे, असा आरोप भाजपा महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटव्दारे केला आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरगस्तांना प्रत्येक १० हजार रुपये अनुदान देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात फक्त ५ हजार रुपये इतकीच मदत पूरगस्तांना मिळाली आहे. त्यामुळे सरकार पूरगस्तांवर अन्याय करत असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.
पूर्व विदर्भात पुरामुळे अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. यात अनेक हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडून मदतही देण्यात येत आहे. मात्र. ही मदत अत्यंत कमी आहे. महाविकास आघाडी सरकारकडून ही पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांची थट्टा केली जात असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार हे पूर्व विदर्भातील असूनही अन्यायकारक भूमिका घेत आहेत. पूरगस्तांना प्रत्येकी १० हजार रुपये अनुदान देणार होते, मात्र ते फक्त ५ हजार रुपये मिळाले आहे. त्यामुळे ही बाब पूरग्रस्तांवर अन्याय करणारी असल्याची प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली. शिवाय पुरामध्ये शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, अद्यापही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोणतीच मदत मिळालेली नाही. सोबतच मदतीसाठी शासन निर्णय जारी केल्यानंतरही त्याची प्रत्यक्षात अंमलबजाणी होत नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्तांची थट्टा करू नये, असे सांगतानाच, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकसान झालेल्या पूरगस्तांची दखल घेऊन वेळीच मदत करावी. यासाठीच ट्विट केल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.