ETV Bharat / state

Chandrashekhar Bawankule :... तर जोडे खावे लागतील; चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा - भाजप कार्यकर्ते जोडे मारो आंदोलन

देवेंद्र फडणवीस हे नागपूरला (Devendra Fadnavis Kalank Statement) लागलेलं कलंक आहे, अशी जहरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नागपुरात आयोजित मेळाव्यात केली होती. त्यानंतर मंगळवारी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोपांची सरबत्ती करत घणाघाती टीका केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jul 11, 2023, 3:12 PM IST

Updated : Jul 11, 2023, 3:53 PM IST

प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर - महाराष्ट्रात ज्या-ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे देवेंद्र फडणीसांवर बोलतील त्या-त्या ठिकाणी जोडे मारो आंदोलन करू, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला (Devendra Fadnavis Kalank Statement) आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलाल तर जोडे खाल, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र जिथे जिथे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतील तिथे तिथे भाजपचे कार्यकर्ते जोडे मारो आंदोलन करतील. देवेंद्र फडणवीस हे अष्टपैलू कर्तुत्वाचे धनी आहेत. यांच्याबद्दल शून्य कर्तृत्व असलेल्यांनी बोलू नये - चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा

फ़डणवीस महाराष्ट्राचे लोकनेते -राज्यात सर्वात यशस्वी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघितले जातं. जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल आदराचं स्थान आहे. ते महाराष्ट्राचे लोकनेते तर आहेत पण ते अष्टपैलू कर्तुत्वाचे धनी देखील आहेत. यांच्याबद्दल शून्य कर्तृत्व असलेले उद्धव ठाकरे यांनी जी टीका केली त्याला महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी उत्तर देण्याचं ठरवलं आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले आहेत.

फडणवीस यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची तुलना -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 22 व्या वर्षी नगरसेवक झाले, 24 व्या वर्षात भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष, 27 वर्षी महापौर आणि 29 व्या वर्षी आमदार म्हणून जनतेतून निवडून आले. तर दुसरीकडे वयाच्या 22 ते वयाच्या 29 पर्यंत उद्धव ठाकरेंची सुरुवात म्हणजे माझे वडील इतकीच होती. वयाच्या 31 व्या वर्षी देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले. 43 व्या वर्षी ते महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि 44 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. या वयात उद्धव ठाकरे यांचे काय कर्तृत्व आहे. तेव्हा माझे वडील आणि माझा कॅमेरा एवढं कर्तृत्व उद्धव ठाकरेचं होतं. त्यानं माझी पत्नी आणि साठाव्या वर्षीचे कर्तुत्व म्हणजे माझा मुलगा मंत्री, मी मुख्यमंत्री आणि पत्नी असा त्यांचा जीवनपट आहे.

कर्तृत्व शून्य उद्धव ठाकरे - उद्धव ठाकरे हे शून्य अस्तित्व व्यक्ती असा थेट आरोप बावनकुळे यांनी केला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी जिद्द मेहनतीने नगरसेवक ते मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते पदाचा प्रवास पूर्ण केला आहे. स्वतःच्या नेतृत्वाला कर्तृत्व समजून उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या जनतेसोबत बेईमानी करून मुख्यमंत्रीपदाचा प्रवास केल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

कमिशनसाठी प्रकल्प रोखले - महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आली तेव्हा राज्यातील अनेक प्रकल्प उद्धव ठाकरे यांनी कमिशनसाठी रोखून धरल्याचा गंभीर आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तर दुसरीकडे देशात महाराष्ट्राला नंबर वन करण्याकरता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने प्रयत्न करत आहेत. देशात आज सर्वाधिक लांब मेट्रोचे जाळे महाराष्ट्रात तयार केल्याचं ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. Uddhav Thackeray : 'मी फक्त जाणीव करून दिली, शिव्या दिल्या नाही', फडणवीसांवरील वक्तव्यावर उध्दव ठाकरेंचा खुलासा
  2. Devendra Ek Abhiman : उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचे नागपुरात संतप्त पडसाद, भाजप विरुद्ध शिवसेनेत रंगले ट्विटर 'वार'
  3. Dhananjay Munde Death Threat: छगन भुजबळांनंतर राज्याचे नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांनाही धमकीचा फोन, 50 लाख रूपयांची मागणी

Last Updated : Jul 11, 2023, 3:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.