ETV Bharat / state

नागपूरात भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले - घटना सीसीटीव्हीत कैद

शहरात दिवसाढवळ्या एका महिलेचे मंगळसूत्र चोरी केल्याची घटना पुढे आली आहे.वर्ध्यातील हिंगणघाटमधून नागपूरला कामानिमित्त आलेल्या ज्योत्स्ना भगत यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले आहे.या घटनेनंतर पोलिसांनी दोन चोरांना अटक केली असून तिसरा चोर फरार आहे.

अटक केलेल्या आरोपींबरोबर पोलीस कर्मचारी
author img

By

Published : Jun 9, 2019, 5:37 PM IST

नागपूर- शहरात दिवसाढवळ्या एका महिलेचे मंगळसूत्र चोरी केल्याची घटना पुढे आली आहे. ही घटना गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मध्यवर्ती स्थानकासमोर घडली असून ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

सी.सी.टी.व्ही मध्ये कैद झालेले चोरीचे दृष्य

वर्ध्यातील हिंगणघाटमधून नागपूरला कामानिमित्त आलेल्या ज्योत्स्ना भगत यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले आहे. अत्यंत वर्दळीच्या आणि वाहतूक पोलीस तैनात असलेल्या गणेशपेठमधील बसस्थानकासमोर हे तीनही चोर एकाच वाहनावरून आले होते. त्यांनी सगळ्यांसमोर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले व तेथून पळ काढला. या घटनेनंतर पोलिसांनी दोन चोरांना अटक केली असून तिसरा चोर फरार आहे.

या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या शहरात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शहरातील वाढत्या गुन्हेगारी वर आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी 'ऑपरेशन ऑल आउट' ही मोहीम सुरू केली आहे. मात्र गृहमंत्र्यांच्या शहारत भरदिवसा आशा घटना घडत असल्यानं उपराजधानीत चोरट्यांना कायद्याचा धाक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Intro:वर्दळीच्या ठिकानी साखळी चोरट्यांचा हैदोस

दिवसाढवळ्या गजबजलेल्या भागात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झालीय आहे नागपूरच्या गणेशपेठ पोलिस ठाण्या हद्दीतील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील ही घटना आहे
वर्ध्यातील हिंगणघाटमधून नागपूरला कामानिमित्त आलेल्या ज्योत्स्ना भगत यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावलं. अत्यंत वर्दळीच्या आणि वाहतूक पोलीस तैनात असलेल्या गणेशपेठमधील बसस्थानकासमोर तीनही चोर एकाच वाहनावरून आले आणि सगळ्यांसमोर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पडाले या घटनेनंतर पोलिसांनी दोन चोरांना अटक केली असून तिसरा चोर फरार आहे. Body: या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या शहरात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे पाहायला मिळतेय आहे. विशेष म्हणजे शहरातील वाढत्या गुन्हेगारी वर आळा घालण्या साठी नागपूर पोलिसांची 'ऑपरेशन ऑल आउट' ही मोहीम सुरू आहे मात्र गृहमंत्र्यांच्या शहारत भरदिवसा आशा घटना घडत असल्यानं उपराजधानीत चोरट्यांना कायद्याचा धाक नसल्याचे स्पष्ट झालेय
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.