नागपूर - कोरोनाचे संकट मोठे आहे. या संकटात संघर्ष करून यात संकटावर मात करायची आहे. एकमेकांची मदत करून पुढे जायचे आहे. डॉक्टर, पोलीस, मेडीकल स्टाफ जीवावर उदार होऊन काम करत आहेत. यामुळे त्यांचे उपकार विसरले जावू शकत नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हणाले.
नागपुरात स्पाईस हेल्थच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिली मोबाईल आरटीपीसीआर टेस्टिंग लॅबचे उद्घाटन झाले. हे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले यावेळी ते बोलत होते. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होते. सुरेश भट सभागृहाच्या परिसरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माहापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, गिरीश व्यास, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यात मोबाईल लॅबच्या माध्यमातून 24 तासात आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मोबाईलवर मिळणार आहे. यामध्ये नमुने देताना मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली जाईल. त्याच मोबाईल क्रमांकावर हा अहवाल मिळणार आहे. पूर्वी अहवाल मिळायला जवळपास 24 तास ते 72 तास किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागत होता. यामुळे याचा फायदा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मदत होणार आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ही दुसरी लाट आहे. इतर ठिकाणची परिस्थिती पाहता तिसरी आणि चौथी लाट लक्षात घेऊन दूरचा विचार करावा लागेल. यासाठी आतापासूनच विचार होणेही गरजेचे आहे. यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले.
नागपूरसह विदर्भाला होणार फायदा, 12 तासांत चाचणीचा अहवाल मिळण्यासाठी प्रयत्न
या फिरत्या लॅबच्या माध्यमातून जवळपास तीन हजार चाचण्या रोज करून 24 तासांत अहवाल मिळणार आहे. यांमुळे रुगणाचे निदान लागण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. यात येत्या काही दिवसात 12 तासात अहवाल मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. याचा फायदा केवळ नागपूरच नाही तर विदर्भातील इतर काही जिल्ह्यातून नमुने असल्यास तेही तपासून दिले जाणार आहे.
आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू
आज मिळणारे 200 ऑक्सिजन काँसेनट्रेटर ग्रामीण भागात दिले जाईल. यात देवलापार, आलापल्ली, सिरोंचा या भागात दिले जाणार असल्याचेही केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले. ऑक्सिजनच्या अभावाने मृत्यू होत आहे हे दुःखद आहे. सीएसआर फंडातून 5 ऑक्सिजन प्लान्ट जे हवेतून ऑक्सिजन निर्माण करतील यावर काम सुरू आहे. डब्लूसीएलच्या माध्यमातून 15 कोटी खर्च करून ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याच्या निर्णय शेवटच्या टप्प्यात आहे. रेमडेसिवीर येत्या आठवड्यात त्याचा साठा मिळून मोठा दिलासा मिळणार आहे.
आनंदाची बातमी
या लॅबमुळे दररोज 25 ते 30 हजारच्या घरात कोरोना चाचणी होणार आहे. यामुळे रिपोर्ट मिळायला लागणारा वेळ होत आहे. यात दररोज तीन हजार चाचण्यांची क्षमता वाढणार असल्याने दररोज शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मेयो आणि मेडिकलच्या लॅबचा ताण कमी होईल. शिवाय यासाठी लागणारा खर्च महाराष्ट्र सरकारने उचलल्याने मोफत सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरिकांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे.
हेही वाचा - नागपुरात २५ वर्षीय महिला डॉक्टरवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, सहकारी डॉक्टरला बेड्या