ETV Bharat / state

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीच्या दिवशीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर सकाळी ९ वाजता धम्मदीक्षा घेतली होती. त्या प्रसंगाची स्मृती म्हणून यावर्षीदेखील विजयादशमीचे औचित्य साधून आज दीक्षाभूमीवर तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व तसेच अस्थीला माल्यार्पन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा
author img

By

Published : Oct 25, 2020, 3:07 PM IST

नागपूर - दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीकडून नागपूर येथील दीक्षाभूमी येथे ६४ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाचे सर्व कार्यक्रम कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आले.

धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीच्या दिवशीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर सकाळी ९ वाजता पुज्य महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून त्रिशरण व पंचशिल ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली होती. त्या प्रसंगाची स्मृती म्हणून यावर्षीदेखील विजयादशमीचे औचित्य साधून आज दीक्षाभूमीवर तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व तसेच अस्थीला माल्यार्पन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले व सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. भिक्खू संघातर्फे बुद्ध गाथेचे पठन व त्यांचे मराठी आणि हिंदी भाषेत भाषांतर करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाकडून मानवंदना देण्यात आली.

हेही वाचा - अंबाझरी तलाव बळकटीकरणासंदर्भात त्वरीत कार्यवाही करा; महापौर संदीप जोशी यांचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.