नागपूर - नागपूर-हैद्राबाद मार्गावर रात्री तीनच्या सुमारास कार आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी आहे. बालचंद उइके, पीयूष टेकाडे, नेहा गजभिये आणि पायल कोचे अशी मृतांची नावे आहे. मृत्यू झालेले सर्व नागरिक नागपूर शहरातील रहिवासी आहेत.
या भीषण अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे सर्व कर्मचारी मिहान परिसरातील एका कंपनीत कामाला कामाला होते. कंपनीतून शिफ्ट संपवून कारने घरी जात असताना खापरी-चुचभवन जवळ पोहोचले असता, चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
अपघातानंतर ट्रेलर चालक पसार -
हा अपघात झाल्यानंतर ट्रेलर चालक वाहन घेऊन पळून गेल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. अपघातासाठी कारणीभूत ट्रक हा रेती वाहतूक करणारा असावा, असा अंदाज बांधला जात असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.