ETV Bharat / state

एसी बोगीतून गांजाची तस्करी; 90 किलो गांजासह सहा आरोपींना अटक

रेल्वे सुरक्षा पथकाच्या एस्कॉर्ट टीमने पुन्हा एकदा गांजा तस्करीविरूद्ध मोठी कारवाई केली आहे. विशाखापट्टणम-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसमधून (एपी एक्सप्रेस) प्रवास करणाऱ्या सहा प्रवाशांना आरपीएफच्या पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून आरपीएफने तब्बल 11 पॅकेट्समध्ये असलेला 90 किलो गांजा जप्त केला आहे.

nagpur Cannabis smuggling news
नागपूर रेल्वे सुरक्षा पथक कारवाई
author img

By

Published : Jan 10, 2021, 1:27 PM IST

नागपूर - रेल्वे सुरक्षा पथकाच्या एस्कॉर्ट टीमने पुन्हा एकदा गांजा तस्करीविरूद्ध मोठी कारवाई केली आहे. विशाखापट्टणम-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसमधून (एपी एक्सप्रेस) प्रवास करणाऱ्या सहा प्रवाशांना आरपीएफच्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आरपीएफने तब्बल 11 पॅकेट्समध्ये असलेला 90 किलो गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाचा बाजारभाव 9 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये राजेंद्र संतोष मंडल मुरली, संजीव कुमार सिंह, हरपाल सिंग, कांचन कुमार राम, करीम मोहम्मद कुरेशी आणि सद्दाम अलाउद्दीन हुसेन यांचा समावेश आहे.

नागपूर रेल्वे सुरक्षा पथक कारवाई
एसी कोचमधून गांजाची वाहतूकचंद्रपूर ते नागपूर दरम्यान विशाखापट्टणम हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसची चेकिंग करताना आरपीएफच्या एस्कॉर्ट टीमला एसी कोचमध्ये प्रवास करणाऱ्या चार आरोपींच्या हालचालींवर संशय आला होता. त्यानंतर या आरोपींसह त्यांच्याकडे असलेल्या सामानावर देखील नजर ठेवली जात होती. त्यावेळी प्रत्येकाच्या पिशव्या क्षमतेपेक्षा खूप मोठी असल्याचे दिसून आले. गाडी नागपूरला येताच आरपीएफच्या पथकाने त्यांच्या सामानाची तपासणी केली तेव्हा त्यामध्ये गांजाची पाकिटे असल्याचे निष्पन्न झाले. त्या चोघांची सखोल विचारपूस केली तेव्हा त्यांचे आणखी दोन साथीदार सुद्धा गांजा घेऊन याच एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असल्याची माहिती आरपीएफच्या पथकाला मिळाली, त्यानंतर त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 9 लाख रुपये किमतीचा 90 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या 20 दिवसात आरपीएफ नागपूर विभागाने सुमारे 161 किलो गांजा जप्त केला असून गांजाची तस्करी करणाऱ्या एकूण 12 आरोपींना अटक केली.

एसी बोगीतून गांजा तस्करी
विशेष म्हणजे यापूर्वी रेल्वेतून होणारी गांजा तस्करी स्लीपर कोचमधून केली जायची. मात्र आरपीएफकडून स्लीपरकोच बोगीची कसून तपासणी केली जाते. त्यामुळे आरोपींनी कुणालाही संशय येऊ नये म्हणून आता एसी बोगीतून गांजाची तस्करी सुरू केल्याची माहिती आरपीएफच्या पथकाला मिळाली होती. ज्यानंतर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आरोपींच्या मुसक्या अवळण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - देशातील सात राज्यात 'बर्ड फ्लू'चा प्रसार, इतर राज्ये सतर्क

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.