नागपूर - बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर धम्म दीक्षा ग्रहण केली. १४ ऑक्टोबर १९५६ ला विजयादशमीच्या दिवशी बाबासाहेबांनी धम्म दीक्षा घेतली होती. या ऐतिहासिक घटनेचा ६२ वा वर्धापन दिन आहे. या दिवशी बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर एकत्रित येऊन बाबाहेबांना अभिवादन करतात. याही वर्षी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारो भीम सैनिक दीक्षाभूमीवर आले होते.
हेही वाचा - पूर्व नागपूर मतदारसंघात विकास विरुद्ध भकासचे राजकारण तेजीत
बाबासाहेबांनी ज्या दिवशी धम्म दीक्षा ग्रहण केली होती तो दिवस विजयादशमीचा होता. तेव्हापासून प्रत्येक दसऱ्याला दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. तिथीनुसार तो दिवस १४ ऑक्टोबरचा असल्याने नागपूरसह विदर्भातील बौद्ध अनुयायांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस अभिवादन केले. आजच्या दिवसाचे औचित्य साधून दीक्षाभूमी परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून धम्मचक्र प्रवर्तनाचा सण साजरा करण्यात आला.
हेही वाचा - नागपूर; जातीच्या राजकारणावर सकारात्मक विचाराचे राजकारण भारी पडणार- बंटी शेळके