ETV Bharat / state

अंधश्रद्धेतून दहा दिवसांच्या बछड्याची केली शिकार, प्रकरणातील मुख्य सुत्रधार आहे सरपंच - hunting a ten day old tiger calf in nagpur district

अंधश्रद्धेतून पैशाची पाऊस पाडण्यासाठी अवघ्या दहा दिवसांच्या वाघाच्या बछड्याची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील चिंचबोडीच्या जंगलातून या बछड्याला आणले होते. दरम्यान, बुटीबोरी वन परिक्षेत्राच्या हद्दीत या बछड्याचे मृत अवयवांची विक्री करताना दोघेजण वनविभागाच्या हाती लागले आहेत. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार हा गावातली सरपंच असून, लोमेश दाबले असे त्याचे नाव आहे.

अंधश्रद्धेतून दहा दिवसांच्या बछड्याची केली शिकार

author img

By

Published : Oct 8, 2021, 8:39 AM IST

नागपूर - अंधश्रद्धेतून पैशाची पाऊस पाडण्यासाठी अवघ्या दहा दिवसांच्या वाघाच्या बछड्याची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील चिंचबोडीच्या जंगलातून या बछड्याला आणले होते. दरम्यान, बुटीबोरी वन परिक्षेत्राच्या हद्दीत या बछड्याचे मृत अवयवांची विक्री करताना दोघेजण वनविभागाच्या हाती लागले आहेत. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार हा गावातली सरपंच असून, लोमेश दाबले असे त्याचे नाव आहे. तर त्याच्या सहकाऱ्याचे नाव कालिदास रायपूर असे आहे. हे दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. त्यांना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

अंधश्रद्धेतून दहा दिवसांच्या बछड्याची केली शिकार
अंधश्रद्धेतून दहा दिवसांच्या बछड्याची केली शिकार

शिकारी प्रकरणात गावाचा सरपंच सुत्रधार

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याच्या चिंचबोडी गावचे सरपंच असलेल्या लोमेश दाबले याचे जंगल परिसराला लागून शेत आहे. येथे वाघाच्या बछड्याची पूजा करून पाऊस पाडू शकतो असा समज होता. या समजूतीतू (मे. 2021)मध्ये या पूजेसाठी त्यांनी अवघ्या 10 दिवसाच्या वाघाचा बछड्याचा बळी दिला. पण शेतात पैश्याची पाऊस न पडल्याने अखेर मृत 10 दिवसाच्या बछड्याच्या शरीराचे जतन केले. यात काही दिवस शांत राहून ते मृत शरीर विक्रीस काढले. याची चुणूक नागपूर वनविभागाला लागली.

सापळा रचून केली करवाई

यात दोन्ही आरोपी हे चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील आहेत. दरम्यान, यातील कालिदास रायपूरे याने या बाबतचा सौदा करण्यासाठी पडोली येथे भेटण्याचे ठरले. यात याची माहिती नागपूरचे उप वनसंरक्षक डॉ. भारतसिंग हाडा यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी या कामाची जबाबदारी साह्यक वनसंरक्षक तथा पथक प्रमुख नरेंद्र चांदेवर यांना दिली. त्यांनी चंद्रपूर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण गाडीवर यांच्याशी समन्वय साधत ही कारवाई केली. यावेळी त्या दोन्ही शिकार करणाऱ्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, चौकशी केली असता त्यांच्याकडून मृत जनावरांचे अवयव जप्त करण्यात आले. तसेच, बछड्याचा सांगाडा जप्त करण्यात आला.

अंधश्रद्धेचा बळी ठरला दहा दिवसांच्या वाघाचा बछडा

जिथे हवामानात बदल झाल्याने पाऊस पडत नाही तिथे वाघ, कासव, यासारख्या वन्यप्राणी यांच्यावर पूजा करून पैशाचा पाऊस कसा पडू शकतो? अशा बाबींवर विश्वास ठेवणारा गावचा सरपंच लोमेश दाबले आणि दुचाकीच्या शोरूममदध्ये काम करणारा कालिदास हा पदवीधर आहे. पण झटपट पैशाच्या नादात गुन्हेगार होऊन बसले. शेवटी पैसा भेटला नाही आणि त्या 10 दिवसाच्या बछड्याचा नाहक बळी ठरला. यांना मात्र आता वनकोठडीत प्रश्ननांचा पाऊस आणि कोठडीची हवा मोफत मिळणार आहे. त्यामुळे लोकांनी अशा खोट्या बाबींवर विश्वास ठेवू नये, असे आवहान वन विभागाकडून केले करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास साह्यक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार करत आहेत.

हेही वाचा - रत्नागिरीत एका रात्रीत २१ श्वानांचा संशयास्पद मृत्यू; सुमारे ३० श्वान बेपत्ता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.