ETV Bharat / state

प्रेयसीने नाते तोडले म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त केले असे नाही - मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ

प्रेयसीने प्रियकराशी नात तोडून (Breaking up does not mea) दुसरे लग्न केले. या विरहातून प्रियकराने आत्महत्या केली, म्हणून त्यासाठी प्रेयसीला दोषी ठरवता येत नाही (Not motivating for suicide) असे म्हणत बुलढाणा जिल्ह्यातील एका प्रेयसीवर दाखल असलेला गुन्हा रद्द केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे (Nagpur Bench of Mumbai High Court) न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि गोविंद सानप यांनी हा महत्वपूर्ण निर्णय दिला.

Nagpur Bench
नागपूर खंडपीठ
author img

By

Published : Jun 10, 2022, 7:05 PM IST

नागपूर: बुलढाणा जिल्ह्यतील मनीषा (बदलले नाव) नामक तरुणीसोबत जीवनचे विवाह बाह्य संबंध होते. त्याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतलेला नव्हता. दोघांत बरेच दिवस प्रेमसंबध होते. त्याचा पत्नीसोबत वाद सुरू होता. पण पत्नीसोबत घटस्फोट घेऊन मनीषासोबत लग्न करण्यास त्याने असमर्थ दाखवली. मनीषाने सुद्धा जीवनशी लग्न करण्यासाठी समजूत घातली. पण मनीषाला यश आले नाही. त्यामुळे तिने जीवनसोबत असलेले नातेसंबंध तोडून (Breaking up does not mea) विवाह करण्याचा पर्याय निवडला.

तिने दुसारा विवाह केल्यानंतर अगोदरच पत्नीपासून दूर झाल्याने नैराश्यात गेलेल्या जीवनने आत्महत्या केली. यात जीवनच्या आईने 7 मे 2021 रोजी पोलिसात तक्रार दिल्याने मनिषावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात मनीषाने आपल्यावर अन्याय झाला असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका दाखल केली. ती न्यायालयाने मान्य केली. यात आईने केलेला आरोपावर न्यायालयाने सुनावणी घेत दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले.

यात निरीक्षण नोंदवतात जरी दोघांत प्रेम असले तरी जीवन हा पत्नीपासून दूर झाल्याने अगोदरच नैराश्यात होता. यात जरी मनीषाने विवाह केला तर त्यासाठी मनीषा दोषी ठरत नाही. मानिषाने जीवन सोबत लग्न करण्यास तयारी दर्शवली होती. पण जीवनने पत्नीपासून घटस्फोट घेतला नाही. त्यामुळे मनीषाने दुसऱ्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. मनीषाने जीवनने आत्महत्या करावी असा कुठलाही कट रचला नाही. त्यामुळे मनीषाने आत्महत्येस प्रवृत्त केले असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्यामुळे मनिषावर अन्याय होऊ नये यासाठी दाखल एफआयआर रद्द करण्याचा निर्णय नागपूर खंडपीठाने केला आहे.

हेही वाचा : Deshmukh and Malik abstained from Rajya Sabha voting, अनिल देशमुख, नवाब मलिक करू शकले नाहीत मतदान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.