ETV Bharat / state

Border gavaskar trophy : पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ नागपुरात दाखल - बॉर्डर गावस्कर चषक

नऊ फेब्रुवारीपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन जामठा मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना रंगणार आहे. त्याकरिता ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ आज नागपुरात दाखल झाला आहे. तर भारतीय संघ चार दिवसांपूर्वीच नागपुरात दाखल झालेला असून व्हीसीए मैदानावर सराव देखील सुरू केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेला नागपूरात दौऱ्यापासून सुरुवात होत आहे. भारतीय संघासाठी लकी असलेल्या या मैदानावर आतापर्यंत एकूण सहा कसोटी सामने खेळण्यात आले आहेत. त्यापैकी 4 सामने भारताने जिंकले आहे.

Border gavaskar trophy
पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ नागपुरात दाखल
author img

By

Published : Feb 6, 2023, 5:25 PM IST

नागपूर : चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर चषक क्रिकेट कसोटी मालिकेत भारतीय संघ 8 दिवसांपुर्वीच दाखल झालेला आहे. भारतीय खेळाडूंनी व्हीसीएच्या जुन्या सिव्हिल लाइन्स मैदानावर सराव केला. त्यानंतर आता जामठा येथील मैदानावर सराव सुरू आहे. उद्यापासून ऑस्ट्रेलिया क्रिकेट देखील सराव करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ चार कसोटी आणि तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आलेला आहे. कसोटी मालिकेतील पहिलाच सामना फेब्रुवारी महिन्यात नागपुरात खेळला जाणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने तब्बल पाच वर्षांनंतर नागपूरकर क्रिकेटप्रेमींना कसोटीचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.

पाच वर्षानंतर कसोटी : नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर तब्बल पाच वर्षांनंतर कसोटी सामना होत असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. जामठा स्टेडियमवर शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर २०१७ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला होता. ऑस्ट्रेलियाचा संघ १४ वर्षांनंतर नागपुरात कसोटी सामना खेळणार आहे. यापूर्वी २००८ मध्ये या नव्या स्टेडियमवरील पहिलाच कसोटी सामना खेळला गेला होता, ज्यात भारताने कांगारूंचा १७२ धावांनी धुव्वा उडवून चार सामन्यांची मालिका २-० ने जिंकली होती.

असा आहे कसोटी सामन्याचा शेड्युल :बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी मालिकेतील पहिली कसोटी ९ ते १३ फेब्रुवारीदरम्यान जामठा स्टेडियमवर रंगणार आहे. तर दुसरी कसोटी दिल्ली येथे, तिसरी कसोटी धर्मशाला येथे, तर चौथी व शेवटची कसोटी लढत अहमदाबाद येथे खेळली जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सुमारे आठ दिवसांपूर्वीच नागपुरात दाखल झालेला आहे. पाच दिवसांचा कसोटी सामना केल्यानंतर १४ फेब्रुवारीला दोन्ही संघ दिल्ली करिता रवाना होती. भारतीय संघ एकूण 14 दिवस नागपूरच्या मुक्कामी असणार आहेत.

बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेटमधील महान खेळाडू : ऑस्ट्रेलियाचे अ‍ॅलन बॉर्डर आणि भारताचे सुनील गावस्कर यांच्या नावाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू झाली. बॉर्डर आणि गावस्कर हे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिले दोन क्रिकेटपटू आहेत. ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 10,000 पेक्षा जास्त कसोटी धावा केल्या. सचिन तेंडुलकर (३२६२), रिकी पाँटिंग (२५५५) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (२४३४) या ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारे तीन खेळाडू आहेत.

व्हीसीएचे आउटफिल्ड खूप वेगवान : लाल मातीपासून बनलेल्या गावस्कर करंडक स्पर्धेसाठी नागपूर सज्ज आहे. ही खेळपट्टी लाल मातीची बनलेला असल्यामुळे येथील खेळपट्टीवर चेंडूला भरपूर बाउंस मिळतो. त्यामुळे वेगवान गोलंदाजांसाठी ते फायदेशीर आहे. या खेळपट्टीवर विकेटच्या बाउंसमुळे फलंदाजी करणेही सोपे आहे. बाउंसमुळे चेंडू थेट बॅटवर येतो. व्हीसीएचे आउटफिल्ड खूप वेगवान आहे. याचा फायदा फलंदाजांना मिळू शकतो. जसजसा सामना पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी संत होत जाते.

हेही वाचा : Border Gavaskar trophy : भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका; विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.