ETV Bharat / state

'भाजयुमो'चा गृहमंत्र्यांच्या निवासस्थानास घेराव घालण्याचा प्रयत्न - नागपूर राष्ट्रवादी बातमी

औरंगाबाद येथे काही दिवसांपूर्वी एका शिक्षिकेने राष्ट्रावादी युवक प्रदेशाध्यक्षाविरोधात अत्याचार केल्याची तक्रार केली होती. याच्या निषेधार्थ भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुक यांच्या निवासस्थानास घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तसेच सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

आंदोलक
आंदोलक
author img

By

Published : Dec 30, 2020, 3:22 PM IST

Updated : Dec 30, 2020, 4:33 PM IST

नागपूर - औरंगाबाद येथे काही दिवासांपूर्वी एका युवतीवर राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षाने शिकवणी सुरू करण्यासाठी मदत करतो, असे आमिष दाखवून एका शिक्षिकेवर अत्याचार केल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर राज्यभरातील भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानास घेराव घालण्याचा प्रयत्न केला.

आंदोलक

बुधवारी (दि. 30 डिसें.) नागपुरातील भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना आधीच अडवल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी भाजपच्या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमधे शाब्दिक चकमक उडाली. यावेळी आंदोलकांकडून महाराष्ट्र सरकार व गृहमंत्री अनिल देशमुख विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. महाराष्ट्रात महिलांवरील वाढते अत्याचार पाहता गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी भाजप युवा मोर्चातर्फे करण्यात आली.

काय आहे प्रकरण

पीडित शिक्षिका शिकवणी सुरू करण्यासाठी इमारतीचा शोध घेत होती. त्यावेळी चांगली जागा शोधून देतो, असे आश्वासन आरोपीने दिले होते. या दरम्यान आरोपीने पीडितेला मुंबईला जाऊन नोकरीबाबत प्रयत्न करू शकतो,असे आश्वासन दिले होते. शिवाय राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांची भेट घालून देतो ते आपल्याला मदत करतील, असे आश्वासन दिले. आरोपीवर विश्वास ठेऊन पीडिता मुंबईसाठी निघाली. मात्र, आरोपीने वाटेत अत्याचार केल्याची तक्रार महिलेने केली आहे.

हेही वाचा - स्पेसवूड कंपनीला लागेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरूच; जीवितहानी नाही

हेही वाचा - नागपूर : गॅस सिलेंडर भाववाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन

Last Updated : Dec 30, 2020, 4:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.