ETV Bharat / state

राज्यात वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनेविरोधात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचा आक्रोश

राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या घटना थांबवण्याची जबाबदारी सरकारवर आहे. मात्र, हे सरकार महिलांचे रक्षण करण्यात पुर्णपणे अपयशी ठरले आहे, असे म्हणत आज भाजप महिला मोर्चातर्फे नागपुरात आंदोलन करण्यात आले.

भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचा आक्रोश
भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचा आक्रोश
author img

By

Published : Oct 12, 2020, 4:43 PM IST

नागपूर - उत्तर प्रदेश येथील हाथरस बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशभरात अशा घटनांबद्दल तीव्र रोष निर्माण झालेला आहे. राज्यातसुद्धा बलात्काराच्या आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने आज भाजपच्या महिला मोर्चातर्फे नागपुरात विविध ठिकाणी प्रदर्शन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या घटना थांबवण्याची जबाबदारी सरकारवर आहे. मात्र, हे सरकार महिलांचे रक्षण करण्यात पुर्णपणे अपयशी ठरले आहे, असे म्हणत आज भाजप महिला मोर्चातर्फे नागपुरात आंदोलन करण्यात आले. राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. महिला सुरक्षेकडे या सरकारचे कोणतेच लक्ष नसल्याचे देखील ते म्हणाले आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराजवळ भर चौकात हत्येची घटना घडते. यावरून त्यांचे किती वचक शिल्लक असेल यावर सुद्धा बावनकुळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यात राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचा दावा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

हेही वाचा - शेतात कापूस वेचताना वीज पडून तीन महिलांचा मृत्यू तर दोघी जखमी; नागपूर जिल्ह्यातील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.