ETV Bharat / state

भाजप आमदार प्रवीण दटके यांना कोरोनाची लागण, कार्यकर्त्यांना टेस्ट करून घेण्याचे आवाहन - mla pravin datke corona

प्रवीण दटके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली होती ज्यामध्ये त्यांनी स्वतःला कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले होते. कोरोनामुळे गृह विलगीकृत झालो असलो, तरी या दरम्यान संघटन म्हणून सुरू असलेली कोविड प्रभावित नागरिकांची सेवा अबाधित राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रवीण दटके
प्रवीण दटके
author img

By

Published : Sep 14, 2020, 9:05 PM IST

नागपूर- भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दटके यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते नुकतेच मुंबई येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनात सहभाग नोंदवून नागपूरला परत आले होते. त्यानंतर पुन्हा पक्षाच्या कामात आणि जनसेवेत ते सक्रिय झाले होते. आज त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ठ झाल्याने ते गृह विलगीकरणात गेले आहेत.

प्रवीण दटके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली होती ज्यामध्ये त्यांनी स्वतःला कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले होते. कोरोनामुळे गृह विलगीकृत झालो असलो, तरी या दरम्यान संघटन म्हणून सुरू असलेली कोविड प्रभावित नागरिकांची सेवा अबाधित राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दटके हे नागपूर भाजप शहर अध्यक्ष असल्याने त्यांचा शहरभर दौरा सुरू असतो. त्यामुळे, त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी आणि सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच, कोविड संदर्भात कुठलीही लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करावा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

हेही वाचा- नागपूरमध्ये गरजेपेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती; 5 जिल्ह्यांना पुरवठा सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.