नागपूर - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून नावारूपास येत असलेल्या समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी जोर धरत आहे. असे असताना आता भाजपच्या आमदारांनीसुद्धा या प्रकल्पास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.
समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव द्यायचे याबाबतचा वाद मोठा होत चालला आहे. या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेनी केली होती. त्यात आता भाजप आमदारांनी या महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - 'भाजपला मेहबुबा मुफ्ती, पासवान पटते; त्यांनी आम्हाला सावरकर शिकवू नये'
समृद्धी महामार्ग दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असा असल्याने या महामार्गाला डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्याच्या मागणीकरता भाजप आमदारांनी विधानसभा परिसरात बॅनर झळकावत आंदोलनही केले.
हेही वाचा - 'हिवाळी अधिवेशनाची सांगता होताच दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार'